Join us

यू-ट्युब चॅनल्सवर राष्ट्रवादीची पिछाडी!

By admin | Published: February 20, 2017 5:52 AM

मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकांमध्ये ‘युती’ आणि ‘आघाडी’चे गणित बिघडल्याने सध्या सोशल मीडियापासून ते रस्तोरस्ती,

स्नेहा मोरे / मुंबईमुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकांमध्ये ‘युती’ आणि ‘आघाडी’चे गणित बिघडल्याने सध्या सोशल मीडियापासून ते रस्तोरस्ती, गल्लोगल्ली प्रचाराचा वेग वाढला आहे. मात्र या पक्षांच्या यू-ट्युब चॅनेल्सच्या स्पर्धेत, प्रचारात राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष बॅकफूटवर असल्याचे दिसून आले आहे. ८ नोव्हेंबर २०१२ला सुरू केलेल्या या पक्षाच्या चॅनलचे सबस्क्रायबर्स केवळ ५१४ आहेत.महानगरपालिका, जिल्हा परिषदा व पंचायत समित्यांच्या सार्वत्रिक निवडणुकांकरिता भाजपा, शिवसेना, महाराष्ट्र नवनिर्माण सेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस हे पक्ष स्वबळावर लढत असल्याने प्रचाराकरिता नवनव्या शक्कल अवलंबिल्या जात आहेत. त्यात व्हिडीओ, पोस्ट्स, आॅडिओ, बॅनर्स, लाइव्ह मेसेजिंग असे वेगवेगळे प्रचाराचे फंडे वापरले जात आहेत. यंदा मुंबई, ठाणे या महानगरपालिकांच्या निवडणुका लक्षवेधी असल्याने विविध पक्षांच्या जाहीर सभांमधून होणारी चिखलफेक ही चर्चेचा विषय बनली आहे. या सगळ्यात सोशल मीडियाच्या प्रचारात विशेषत: यू-ट्युब चॅनेल्सही महत्त्वाची भूमिका बजावित आहेत. परंतु, सोशल मीडियाचे जग वेगाने विस्तारल्यानंतरही राजकीय पक्षांनी याचा गांभीर्याने विचार केलेला दिसून येत नाही. यात ४ आॅक्टोबर २०११ रोजी सुरू झालेल्या शिवसेनेच्या चॅन्सलच्या सबस्क्रायबर्सचा आकडाही कमीच असून, तो ७ हजार ४१३ एवढाच असल्याचे दिसून आले आहे.यू-ट्युब चॅनेल्सच्या सबस्क्रायबर्समध्ये भारतीय जनता पार्टीने मात्र आघाडी मिळविली असून, १३ सप्टेंबर २०१० रोजी सुरू झालेल्या या चॅनलचे तब्बल १ लाख ७७ हजार ४२७ सबस्क्रायबर्स आहेत. तसेच २२ आॅगस्ट २०१२ रोजी सुरू झालेल्या काँग्रेसच्या यू-ट्युब चॅनलचे सबस्क्रायबर्स २१ हजार ९७३ आहेत, तर २८ जानेवारी २०१३ रोजी सुरू झालेल्या महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या चॅनलचे ११ हजार ६२६ सबस्क्रायबर्स आहेत.