Join us

... 'इथं माझंच जंगलराज', खडसेंच्या उमेदवारीवरुन राष्ट्रवादीच्या व्यंगचित्रातून मुख्यमंत्री टार्गेट

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 7, 2019 14:13 IST

आरेमधील वृक्षतोडीविरोधात सर्वोच्च न्यायालयाने आज मोठा निर्णय दिला आहे.

आरे जंगलातील वृक्षतोडीच्या प्रश्नावरुन राष्ट्रवादी काँग्रेसने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर निशाणा साधला आहे. राष्ट्रवादीने एक व्यंगचित्र बनवले असून त्यामध्ये भाजपाकडून ज्या नेत्यांची तिकीटं कापण्यात आली आहेत, त्या नेत्यांचे चेहरे झाडांच्या खोडांवर ठेऊन मुख्यमंत्र्यांच्या हातात करवत दाखवली आहे. 

आरेमधील वृक्षतोडीविरोधात सर्वोच्च न्यायालयाने आज मोठा निर्णय दिला आहे. आरेमधील वृक्षतोडीविरोधात दाखल याचिकेवर सुनावणी करताना सर्वोच्च न्यायालयाने आरेमधील वृक्षतोडीला तूर्तास स्थगिती दिली आहे. याप्रकरणी जोपर्यंत पर्यावरणविषयक खंडपीठाचा निर्णय येत नाही तोपर्यंत आरेमधील परिस्थिती जैसे थे ठेवण्याचे आदेश सर्वोच्च न्यायालयाने दिले आहेत. सर्वोच्च न्यायालयाचा हा निर्णय राज्य सरकारसाठी धक्का मानला जात आहे. मात्र, त्यापूर्वी आरेतील वृक्षतोडीवरुन विरोधी पक्षांनी सरकारला लक्ष्य केलं होतं. तर, शिवसेनेचे उमेदवार आणि युवासेनेचे प्रमुख आदित्य ठाकरेंनीही आपला उघडपणे विरोध या वृक्षतोडीला दर्शवला आहे. 

आरेतील वृक्षतोडीवरुन राष्ट्रवादी काँग्रेसने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनाच टार्गेट केलं आहे. विशेष म्हणजे, केवळ आरेच नाही तर मी पक्षातील जुनी खोडही कापतील, अशा आशयाचे व्यंगचित्र राष्ट्रवादीने आपल्या फेसबुक आणि ट्विटर अकाऊंटवरु शेअर केला आहे. त्यामध्ये एकनाथ खडसे, चंद्रशेखर बावनकुळे, विनोद तावडे, प्रकाश मेहता, मेधा कुलकर्णी यांचे चेहरे झाडाच्या बुंध्यावर दाखवली आहेत. 

टॅग्स :राष्ट्रवादी काँग्रेसआरेभाजपादेवेंद्र फडणवीसएकनाथ खडसे