Join us

कर्जतमध्ये आजपासून राष्ट्रवादीचे ‘चिंतन’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 06, 2017 6:17 AM

राष्ट्रवादी काँग्रेसचे दोन दिवसांचे चिंतन शिबिर सोमवार ६ नोव्हेंबरपासून कर्जत येथे सुरू होत आहे.

मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेसचे दोन दिवसांचे चिंतन शिबिर सोमवार ६ नोव्हेंबरपासून कर्जत येथे सुरू होत आहे. पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांच्या उपस्थितीत होणाºया या दोन दिवसीय चिंतन शिबिरात विविध राजकीय मुद्द्यांवर चर्चा होणारआहे.चिंतन शिबिराच्या पहिल्या दिवशी शेतकºयांचा प्रश्न, नोटाबंदी, जीएसटी, युवक, महिलांचे सबलीकरण आदी विषयांवर चर्चा होणार आहे. तर दुसºया दिवशी राष्ट्रवादीचा पक्षविस्तार, विविध राजकीय ठराव आणि सध्याच्या राजकीय घडामोडींवर पक्षाची भूमिका स्पष्ट केली जाणार आहे. पक्षाध्यक्ष शरद पवार यांच्या भाषणाने बैठकीचा समारोप होणार आहे.या बैठकीस पक्षाचे ज्येष्ठ नेते प्रफुल्ल पटेल, प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे, अजित पवार, सुप्रिया सुळे, दिलीप वळसे-पाटील, जयंत पाटील यांच्यासह पक्षाचे सर्व नेते विविध आघाड्या आणि सेलचे प्रमुख उपस्थित राहणार आहेत.

टॅग्स :नॅशनल काँग्रेस पार्टी