मुंबई : काँग्रेस आणि राष्ट्रवादीची आघाडी झाल्यापासून चेंबूर विधानसभा मतदारसंघाची जागा ही काँग्रेसच्या ताब्यात आहे. मात्र या वेळेस ही जागा राष्ट्रवादीला मिळावी, अशी मागणी चेंबूरमधील राष्ट्रवादीच्या कार्यकत्र्याकडून करण्यात येत आहे. यासाठी राष्ट्रवादीने काही प्रमाणात मोर्चेबांधणी देखील परिसरात सुरू केली आहे.
कधी सेना, कधी भाजपा तर कधी काँग्रेसची सत्ता राहिलेला चेंबूर मतदारसंघ कधीही राष्ट्रवादीकडे आला नाही. निवडणुका आल्या की नेहमीच राष्ट्रवादीचे कार्यकर्ते काँग्रेसला हवी तशी मदत करतात. मात्र निवडणुका संपल्यानंतर काँग्रेसचे नेते राष्ट्रवादीच्या कार्यकत्र्याना विचारत देखील नाहीत. राष्ट्रवादीच्या कार्यकत्र्याना परिसरातील कामांसाठी देखील या नेत्यांकडे वारंवार फे:या माराव्या लागत असल्याचा आरोप काही राष्ट्रवादीच्या कार्यकत्र्याकडून करण्यात येत आहे. गेली कित्येक वर्षे सामान्य कार्यकर्ता हे सहन करीत आहे. त्यामुळे 2014 च्या विधानसभा निवडणुकीत काँग्रेसने एक संधी राष्ट्रवादीला द्यावी, अशी मागणी देखील या कार्यकत्र्याकडून करण्यात येत आहे.
चेंबूर परिसरात राष्ट्रवादीची देखील चांगली ताकत आहे. त्यामुळे आम्हाला आमची ही ताकत दाखवण्याची संधी मिळाल्यास आम्ही या संधीचे सोने करू, अशी प्रतिक्रिया देखील या कार्यकत्र्याकडून दिली जात आहे. शिवाय सध्या राज्यातील अनेक जागांवरून काँग्रेस आणि राष्ट्रवादीमध्ये मोठा वाद सुरू आहे. यामध्ये जर आघाडी तुटलीच तर आम्ही स्वतंत्र लढण्यास तयार आहोत. यासाठी आमच्या इच्छुक उमेदवारांच्या मुलाखती देखील झाल्याची माहिती काही कार्यकत्र्यानी दिली आहे. यामध्ये चेंबूर महिला तालुकाध्यक्ष आशाताई मराठे, चेंबूर तालुकाध्यक्ष लहू कांबळे, मुंबई सचिव जितेंद्र कांबळे या कार्यकत्र्याचा समावेश आहे.
चेंबूरमधील मुस्लीम आणि दलित मते ही राष्ट्रवादीलाच मिळतील आणि यामध्ये आम्ही नक्की विजय मिळवून दाखवू, असा विश्वास देखील कार्यकत्र्याकडून व्यक्त होत आहे. यावेळी आमच्या पक्षाला संधी मिळाली तर निश्चितच पक्षाला विजय मिळू शकेल, असे त्यांनी सांगितले. (प्रतिनिधी)