राष्ट्रवादीच्या कमलताई पाटील यांचा राजीनामा

By admin | Published: April 7, 2015 05:14 AM2015-04-07T05:14:30+5:302015-04-07T05:14:30+5:30

महापालिका निवडणुकीत उमेदवारी नाकारल्याने राष्ट्रवादीच्या महिला जिल्हा अध्यक्षा कमलताई पाटील यांनी पदाचा तसेच पक्षाचा राजीनामा दिला आहे

NCP's Kamalatai Patil resigns | राष्ट्रवादीच्या कमलताई पाटील यांचा राजीनामा

राष्ट्रवादीच्या कमलताई पाटील यांचा राजीनामा

Next

नवी मुंबई : महापालिका निवडणुकीत उमेदवारी नाकारल्याने राष्ट्रवादीच्या महिला जिल्हा अध्यक्षा कमलताई पाटील यांनी पदाचा तसेच पक्षाचा राजीनामा दिला आहे. सोमवारी प्रदेश कार्यालयात त्यांनी आपला राजीनामा पाठवून दिला.
राष्ट्रवादीच्या महिला जिल्हा अध्यक्षा कमलताई पाटील यांनी प्रभाग ३४ मधून महापालिका निवडणुकीसाठी इच्छुकता दर्शवली होती. मात्र त्यांना पक्षाकडून उमेदवारी नाकारण्यात आलेली. गत महापालिका निवडणुकीतही त्यांना उमेदवारी मिळाली नव्हती. यामुळे पक्षाने सलग दोनदा उमेदवारी नाकारल्याने सोमवारी त्यांनी आपल्या पदाचा तसेच पक्ष सदस्याचा राजीनामा दिला. प्रदेश पक्ष कार्यालयात हा राजीनामा पाठवला असल्याचे कमलताई पाटील यांनी सांगितले. पक्षाला सोडचिठ्ठी दिल्यानंतर प्रभाग ३४ मधूनच त्या शिवसेनेच्या उमेदवारीवर निवडणूक लढवण्याची शक्यता आहे. त्याकरिता मोर्चेबांधणीलाही त्यांनी सुरुवात केली आहे. पाटील या गेली अनेक वर्षे पक्षाशी एकनिष्ठ होत्या.(प्रतिनिधी)

Web Title: NCP's Kamalatai Patil resigns

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.