Join us

राष्ट्रवादीचं 'अर्थ'पूर्ण राजकारण, निधी वाटपात शिवसेना तिसऱ्या स्थानावर

By ऑनलाइन लोकमत | Published: December 17, 2021 2:44 PM

शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे जरी राज्याचे मुख्यमंत्री असले तरी निधीवाटपात शिवसेना तिसऱ्या स्थानावर आहे. अर्थ खातं सांभाळणाऱ्या अजित पवार यांच्या पक्षाने सर्वाधिक निधी खर्च करत पहिला क्रमांक राखला आहे

ठळक मुद्देअर्थ खात्याकडून निधी मिळविण्यात राष्ट्रवादी काँग्रेस क्रमांक 1 वर असून काँग्रेसनेही दुसरा नंबर राखला आहे. मात्र, मुख्यमंत्री आणि सर्वाधिक आमदार असलेल्या शिवसेनेनं तिसरे स्थान मिळवले आहे

मुंबई - राज्यातील महाविकास आघाडी सरकार हे किमान समान कार्यक्रमाच्या आधारावर स्थापन झालं आहे. भाजपला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार आणि शिवसेना प्रवक्ते खासदार संजय राऊत यांनी पुढाकार घेत, राज्यात महाविकास आघाडाची प्रयत्न यशस्वी केला आहे. काँग्रेस, शिवसेना आणि राष्ट्रवादी या तिन्ही पक्षांनी एकत्र येत सरकार स्थापन केलं. या सरकारला नुकतेच दोन वर्षे झाले आहेत. मात्र, गेल्या 2 वर्षात सरकारमध्ये मुख्यमंत्री असलेल्या शिवसेना पक्षाने इतर दोन पक्षांच्या तुलनेत कमी प्रमाणात निधी खर्च केल्याचे उघडकीस आले आहे. 

शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे जरी राज्याचे मुख्यमंत्री असले तरी निधीवाटपात शिवसेना तिसऱ्या स्थानावर आहे. अर्थ खातं सांभाळणाऱ्या अजित पवार यांच्या पक्षाने सर्वाधिक निधी खर्च करत पहिला क्रमांक राखला आहे. आदित्य ठाकरेंच्या पर्यावरण खात्याने आत्तापर्यंत केवळ 14 कोटी रुपयांचा निधी खर्च केला आहे. या खात्यासाठी तब्बल 420 कोटींची तरतूद आहे. सन 2020-21 या वर्षातील निधी वाटपाची आकडेवारी पाहिल्यास निधीवाटपात मोठी असमानता दिसून येते. 

अर्थ खात्याकडून निधी मिळविण्यात राष्ट्रवादी काँग्रेस क्रमांक 1 वर असून काँग्रेसनेही दुसरा नंबर राखला आहे. मात्र, मुख्यमंत्री आणि सर्वाधिक आमदार असलेल्या शिवसेनेनं तिसरे स्थान मिळवले आहे. शिवसेनेला 66,549 कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली असून आत्तापर्यंत केवळ 52,255 कोटी रुपये निधीसेनेकडून खर्च करण्यात आला आहे. सर्वाधिक निधी राष्ट्रवादीला, त्यानंतर काँग्रेसला आणि मग शिवसेनेला तरतूद करण्यात आल्याचे आकडेवारीवरुन दिसून येत आहे. 

पक्ष                केलेली तरतूद           खर्च (कोटी)राष्ट्रवादी           2353 49                 224411  काँग्रेस             105985                100024 शिवसेना          66549                52255  

पक्षनिहाय निधी

शिवसेना - 56 आमदारनिधी 52,255 कोटी

काँग्रेस 43 आमदारनिधी 100034 कोटी

राष्ट्रवादी काँग्रेस 53 आमदार

निधी 224411 कोटी

टॅग्स :उद्धव ठाकरेशिवसेनाअजित पवारराष्ट्रवादी काँग्रेस