कर्जतमध्ये राष्ट्रवादीची बैठक

By admin | Published: August 1, 2014 03:37 AM2014-08-01T03:37:58+5:302014-08-01T03:37:58+5:30

विधानसभेच्या निवडणुकीला कमी दिवसांचा कालावधी राहिला आहे, कार्यकर्त्यांनी जोमाने कामाला लागले पाहिजे,

NCP's meeting in Karjat | कर्जतमध्ये राष्ट्रवादीची बैठक

कर्जतमध्ये राष्ट्रवादीची बैठक

Next

कर्जत : विधानसभेच्या निवडणुकीला कमी दिवसांचा कालावधी राहिला आहे, कार्यकर्त्यांनी जोमाने कामाला लागले पाहिजे, जो काम करतो जनता त्याच्याच मागे राहते, या मतदार संघात आमदार सुरेश लाड यांनी काम केले आहे. त्यामुळे या मतदार संघातील जनता निवडणुकीत त्यांच्याच पाठीशी राहील, असा विश्वास सिडको संचालक वसंत भोईर यांनी व्यक्त केला.
कर्जत शहर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या कार्यकर्त्यांची बैठक येथील राष्ट्रवादी भवन येथे आयोजित करण्यात आली होती. याप्रसंगी आमदार सुरेश लाड, सिडकोचे संचालक वसंत भोईर, नगराध्यक्ष राजेश लाड, युवक राष्ट्रवादी काँग्रेस तालुका कार्याध्यक्ष जगदीश ठाकरे, राजाभाऊ कोठारी, अल्पसंख्याक सेल शहराध्यक्ष बिलाल आढाळ, विद्यार्थी संघटना अध्यक्ष मिथील खोत, युवक शहर कार्याध्यक्ष स्वप्नील जाधव, नगरसेवक उमेश गायकवाड, रणजीत जैन आदी उपस्थित होते.
शहराध्यक्ष शरद लाड व महिला आघाडी शहराध्यक्षा स्मिता पतंगे यांनी उपस्थितांचे स्वागत केले. आमदार सुरेश लाड यांनी या दोन्ही तालुक्यातील मतदार जाणता आहे, प्रत्येक उमेदवाराची पार्श्वभूमी ओळखूनच ते मतदान करतील, अशी खात्री आहे. कर्जत तालुक्यात शहरामध्ये आपण भरपूर कामे केली आहेत, नगरपरिषदेची सत्ता कर्जतकरांनी आपल्या हाती देऊन आपल्यावर विश्वास दाखविला आहे, मात्र लोकसभेच्या निवडणुकीत आपल्याला कमी मतदान झाले आहे, आपण याचे चिंतन केले पाहिजे, असे सांगितले. नगराध्यक्ष राजेश लाड यांनी ही विधानसभेची निवडणूक आपल्या दृष्टीने महत्त्वाची आहे, कार्यकर्त्यांनी जोमाने कामाला लागले पाहिजे. कर्जत शहर प्रत्येक निवडणुकीत आपल्याला चांगलीच साथ देत आहे, असे सांगितले.

Web Title: NCP's meeting in Karjat

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.