दरवाढीविरोधात राष्ट्रवादीचा रेलरोको, प्रवाशांना मनस्ताप
By admin | Published: June 25, 2014 12:16 PM2014-06-25T12:16:46+5:302014-06-25T12:17:05+5:30
रेल्वेच्या प्रवासी भाड्यात वाढ करण्याच्या सरकाराच्या निर्णयाचा निषेध करत राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी ठाण, वाशीसह ठिकठिकाणी रेलेरोको केल्याने प्रवाशांचे मात्र हाल झाले.
Next
>ऑनलाइन टीम
मुंबई, दि. २५ - रेल्वेच्या प्रवासी भाड्यात वाढ करण्याच्या सरकाराच्या निर्णयाचा निषेध करत राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी ठाण, वाशीसह ठिकठिकाणी रेलेरोको केल्याने प्रवाशांचे मात्र हाल झाले. बुधवारी सकाळी राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी ठाणे स्टेशनवर तसेच हार्बर मार्गावर रेले रोको करत नेरुळच्या दिशेने जाणारी गाडी अडवली. सरकारच्या विरोधात घोषणा देत 'भाडेवाढ' मागे घेण्याची मागणीही यावेळी कार्यकर्त्यांनी केली. मात्र या रेलरोकोमुळे सर्वसामान्या प्रवाशांचे मात्र हाल झाले. सकाळच्या घाईच्यावेळी रेलरोकोमुळे अनेक चाकरमान्य गाडीतच अडकून पडले, त्यामुळे त्यांना मनस्ताप सहन करावा लागला. त्यामुळे एकीकडे राष्ट्रवादीचे कार्यकर्ते सरकारविरोधात घोषमा देत असताना, सामान्य नागरिक मात्र या कार्यकर्त्यांविरोधात संतप्त प्रतिक्रिया व्यक्त करत होता.