राज्यातील २३ उच्च शैक्षणिक संस्था नॅक मूल्यांकनात पास

By ऑनलाइन लोकमत | Published: March 10, 2019 05:37 AM2019-03-10T05:37:22+5:302019-03-10T05:40:07+5:30

नुकत्याच जाहीर झालेल्या नॅकच्या मूल्यांकनाच्या निकालानुसार राज्यातील केवळ २३ उच्च शैक्षणिक संस्था मूल्यांकनात पात्र ठरल्याची माहिती पुढे आली आहे.

Near the 23 top educational institutions in the state, NAC evaluation passed | राज्यातील २३ उच्च शैक्षणिक संस्था नॅक मूल्यांकनात पास

राज्यातील २३ उच्च शैक्षणिक संस्था नॅक मूल्यांकनात पास

Next

- सीमा महांगडे 

मुंबई : नुकत्याच जाहीर झालेल्या नॅक (राष्ट्रीय मूल्यांकन व अधिस्वीकृती समिती) च्या मूल्यांकनाच्या निकालानुसार राज्यातील केवळ २३ उच्च शैक्षणिक संस्था मूल्यांकनात पात्र ठरल्याची माहिती पुढे आली आहे. यामध्ये राज्यातल्या केवळ २ उच्च शैक्षणिक संस्थांना ए दर्जा मिळाला असून मूल्यांकनाच्या तिसऱ्या टप्प्यात या संस्थांचा समावेश आहे. ज्या उच्च शैक्षणिक संस्थांच्या मूल्यांकनाला स्थगिती मिळाली आहे त्यामध्ये राज्याच्या ४ संस्थांचा समावेश आहे.

नॅक मूल्यांकन स्थायी समिती ३५ व्या स्थायी समितीकडून अखेरच्या मूल्यांकनासाठी पात्र ठरविल्या गेलेल्या देशातील उच्च शैक्षणिक संस्थांच्या मूल्यांकनाचा निकाल ८ मार्च रोजी नॅककडून जाहीर करण्यात आला आहे. नॅक मूल्यांकनाच्या पहिल्या टप्प्याच्या निकालात राज्याच्या १० शैक्षणिक संस्थांचा समावेश आहे. यातील २ संस्थांना बी प्लस प्लस तर ३ संस्थांना सी ग्रेड मिळाले आहे. दुसऱ्या टप्प्याच्या निकालात राज्याच्या ७ संस्थांचा समावेश आहे. त्यातील फक्त एकाच संस्थेला बी प्लस प्लस दर्जा मिळाला आहे.

तिसºया टप्प्याच्या निकालात ६ संस्थांचा समावेश असून ए दर्जाच्या २ तर बी प्लस दर्जा प्राप्त झालेल्या ३ संस्थांचा समावेश आहे. राज्यातील एकही उच्च शैक्षणिक संस्था मूल्यांकनाच्या चौथ्या टप्प्यात नाही. मात्र ज्यांच्या मूल्यांकनाला अद्याप स्थगिती मिळाली आहे अशांमध्ये राज्याच्या ४ शैक्षणिक संस्थांचा समावेश आहे.

नॅक मूल्यांकनाची पद्धती
नॅकच्या नवीन मूल्यांकन पद्धतीनुसार ७० टक्के संख्यात्मक विश्लेषण, २५ टक्के तज्ज्ञ समितीकडून केली जाणारी पाहणी आणि ५ टक्के महाविद्यालयीन विद्यार्थ्यांकडून घेतला जाणारा आढावा याचा समावेश आहे. त्यामुळे नॅक मूल्यांकन प्रणालीमध्ये अधिक पारदर्शकता आल्याची माहिती तज्ज्ञ समितीकडून देण्यात आली आहे. उच्चशिक्षण संस्थेला आपला स्वयंअभ्यास अहवाल आॅनलाइन, अन्य माहिती, पुरावेसुद्धा आॅनलाइनच द्यावे लागणार आहेत.

शैक्षणिक संस्थांची उदासीनता
राज्यातील सर्व अनुदानित व विनाअनुदानित महाविद्यालये आणि शैक्षणिक संस्थांना राष्ट्रीय मूल्यांकन व अधिस्वीकृती समितीकडून (नॅक) मूल्यांकन करून घेण्याची सक्ती विद्यापीठ अनुदान आयोगाने केली आहे. मात्र, बहुसंख्य महाविद्यालयांनी अद्यापही त्याची गांभीर्याने दखल घेतल्याचे दिसत नाही. एकदाही ‘नॅक’ मूल्यांकन न झालेल्या महाविद्यालयांची संख्याही जास्त असल्याचे पाहायला मिळते.

Web Title: Near the 23 top educational institutions in the state, NAC evaluation passed

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.