Join us

अंधेरी-बोरीवली पास एक लाख ३३ हजारांना

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 17, 2017 5:44 AM

अंधेरी ते बोरीवली प्रथम दर्जा पाससाठी पश्चिम रेल्वेने तब्बल १ लाख ३३ हजार ३३० रुपये आकारल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे.

मुंबई : अंधेरी ते बोरीवली प्रथम दर्जा पाससाठी पश्चिम रेल्वेने तब्बल १ लाख ३३ हजार ३३० रुपये आकारल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. मुळात या टप्प्यातील प्रथम दर्जाच्या तीन महिन्यांच्या पासची किंमत १ हजार ३३३ रुपये ३० पैसे इतकी आहे. मात्र कर्मचाºयाच्या चुकीमुळे प्रवाशाला हा भूर्दंड सहन करावा लागला आहे.यासंदर्भात मिळालेल्या अधिक माहितीनुसार, कर्मचाºयाच्या चुकीमुळे ही रक्कम प्रवाशाच्या खात्यातून वळती झाली. मात्र चूक लक्षात आल्यानंतर पश्चिम रेल्वेने संबंधित कर्मचाºयावर शिस्तभंगाची कारवाई केली आहे. तरी पैसे खात्यात परत न आल्यामुळे प्रवाशाला मनस्ताप सहन करावा लागत आहे.रेल्वे प्रशासनाने बुकिंग काउंटरवर प्रवाशांसाठी ई-पेमेंटची सुविधा सुरू केली. या सुविधेनुसार विकास मंचेकर या प्रवाशाने अंधेरी-बोरीवली मार्गावर प्रथम दर्जाचा तिमाही पास बोरीवली येथे काढला. मंचेकर यांनी बुकिंग क्लार्कला आपले क्रेडिट कार्ड स्वाइप करण्यासाठी दिले. त्या वेळी क्लार्कने एक हजार ३३०.३० रुपयांऐवजी एक लाख ३३ हजार ३३० रुपये आकारण्याचे आदेश मशिनमार्फत दिले. दरम्यान, खात्यातून एक लाखाहून अधिक रुपये डेबिट झाल्याची माहिती मिळताच मंचेकर यांनी सदर प्रकार स्टेशन मास्तरच्या निदर्शनास आणून दिला. संबंधित बँकेला फोन करून त्याने याबाबतची माहिती दिली.>व्याजाची भरपाई करावीविकास मंचेकर यांनी या प्रकरणी स्टेशन मास्तरांंकडे तक्रार केली. कार्डची ड्यू डेट२४ आॅगस्ट आहे. तोपर्यंत रक्कम खात्यात जमा न झाल्यास संबंधित बँकेकडून४ ते ५ हजार रुपयांचे व्याज आकारण्यात येणार आहे. व्याज आकारल्यास त्याची भरपाई पश्चिम रेल्वेने करावी, अशी मागणी मंचेकर यांनी केली आहे. त्याचबरोबर अशा प्रकारची चूक पुन्हा कोणत्याही कर्मचाºयाकडून घडू नये, यासाठी पश्चिम रेल्वेने सर्व कर्मचाºयांना योग्य प्रकारे प्रशिक्षित करणे गरजेचे असल्याचे त्याने सांगितले.