Join us

‘समीप’ लोकल लाखमोलाची

By admin | Published: March 28, 2016 2:46 AM

विस्कळीत होणाऱ्या लोकलच्या सद्य:स्थितीबरोबरच महिला प्रवाशांच्या सुरक्षेची ‘एक मिस्ड कॉल’ देऊन माहिती उपलब्ध करणारी रेल्वे पोलिसांची (जीआरपी) ‘समीप’ (सेफ्टी अलर्ट

मुंबई : विस्कळीत होणाऱ्या लोकलच्या सद्य:स्थितीबरोबरच महिला प्रवाशांच्या सुरक्षेची ‘एक मिस्ड कॉल’ देऊन माहिती उपलब्ध करणारी रेल्वे पोलिसांची (जीआरपी) ‘समीप’ (सेफ्टी अलर्ट मॅसेज एक्सक्लुझिव्ह फॉर पॅसेंजर) योजना प्रवाशांसाठी लाखमोलाची ठरत आहे. ही योजना सुरू झाल्यापासून ते आतापर्यंत एक लाखाहून अधिक नोंदणी झाल्याची माहिती रेल्वे पोलिसांकडून देण्यात आली. गेल्या वर्षाच्या जानेवारी महिन्यात दिवा स्थानकात रेल्वे प्रशासन आणि रेल्वे पोलिसांना प्रवाशांच्या रोषाला सामोरे जावे लागले होते. लोकल उशिराने धावत असल्याचा रोष व्यक्त करीत दिवा स्थानकात प्रचंड तोडफोड करण्यात आली. त्यामुळे लोकल उशिराने धावल्या आणि या घटनेमुळे उपनगरीय लोकल प्रवाशांमध्ये काही अफवाही पसरल्या. या गोंधळानंतर रेल्वे पोलिसांनी प्रवाशांना मुंबई शहर व उपनगरात धावणाऱ्या रेल्वेची सद्य:स्थिती सांगणारी तसेच प्रवाशांच्या सुरक्षेविषयी माहिती देणारी योजना तयार करण्याचा निर्णय घेतला व त्यावर काम सुरू केले. वर्षभरानंतर रेल्वे पोलिसांनी १३ जानेवारी २0१६ रोजी मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर यांच्या हस्ते ‘समीप’ योजनेचा शुभारंभ केला. यासाठी ७२0८0१५२0७ हा हेल्पलाइन नंबर उपलब्ध करण्यात आला. त्यावर मिस्ड कॉल दिल्यावर प्रवाशाला रेल्वेची सद्य:स्थिती देण्यात येते. तसेच रटर टऌ फछउडढ असे टाईप करून १६६ क्रमांकावरही नोंदणी करून माहिती देण्याची सोय केली आहे. जवळपास एक लाखांपेक्षा अधिक नोंदणी करत या योजनेचा लाभ प्रवाशांनी घेतला आहे. रेल्वेच्या सद्य:स्थितीबरोबरच पश्चिम, मध्य रेल्वेवरील मेगाब्लॉक व रेल्वेकडून सोडण्यात येणाऱ्या सुविधा विशेष ट्रेनची माहितीही प्रवाशांकडून घेण्यात येत आहे. (प्रतिनिधी)समीप योजनेचा लाभ प्रवाशांकडून मोठ्या प्रमाणात घेण्यात आला आहे. जवळपास एक लाखाहून अधिक नोंदणी झाली आहे. या योजनेचा प्रवाशांना चांगलाच फायदा होत आहे. - मधुकर पाण्डेय, पोलीस आयुक्त, लोहमार्ग, मुंबई