मुंबई : वर्सोवा-अंधेरी-घाटकोपर मेट्रोच्या प्रवाशांना मुंबई मेट्रो वनकडून ट्रिप पासवर ५0 टक्के सवलत देण्याचा निर्णय घेतला आहे. हा लाभ प्रथम येणाऱ्या २00 पासधारकांना देण्यात येईल, अशी माहिती मेट्रोने दिली. २८ फेब्रुवारीपर्यंत ही आॅफर असणार आहे. सध्या मुंबई मेट्रोचे किमान भाडे १० तर कमाल भाडे ४0 रुपये एवढे आहे. मेट्रोकडून दोन प्रकारांतील ट्रिप पासही देण्यात येतो. सध्या ३0 दिवसांत ४५ फेऱ्यांसाठी अनुक्रमे ६७५ आणि ९00 रुपयांचे पास उपलब्ध आहेत. या दरात ५0 टक्के सवलत देण्याचा निर्णय घेतल्याचे मेट्रोच्या प्रवक्त्याकडून सांगण्यात आले. २८ फेब्रुवारीपर्यंत ही सवलत असल्याने पहिल्या २00 पासधारकांसाठीच ती लागू असेल. त्यानंतर येणाऱ्या पासधारकांना ५0 टक्के सवलत न मिळता फारच कमी सवलत देण्यात येईल. त्यामुळे कमी अंतरासाठी असणारा ६५७ रुपयांचा पास हा ४९९ तर लांबच्या अंतरासाठी असणारा ९00 रुपयांचा पास हा ६९९ रुपयांना मिळेल.
प्रथम २00 पासधारकांना मेट्रोचा पास निम्म्या दरात
By admin | Published: February 11, 2016 1:51 AM