महामुंबईतील रुग्ण २ हजारांजवळ; मृतांचा आकडा पोहोचला ११९ वर

By ऑनलाइन लोकमत | Published: April 14, 2020 07:16 AM2020-04-14T07:16:13+5:302020-04-14T07:16:30+5:30

राज्यातील कोरोनाबाधितांची संख्या २ हजार ४००

Nearly 2,000 patients in Mahabharata; The death toll reaches 119 | महामुंबईतील रुग्ण २ हजारांजवळ; मृतांचा आकडा पोहोचला ११९ वर

महामुंबईतील रुग्ण २ हजारांजवळ; मृतांचा आकडा पोहोचला ११९ वर

Next

मुंबई : राज्यात मागच्या २४ तासांत ३५२ कोरोना रुग्णांचे निदान झाले आहे. त्यामुळे राज्यातील कोरोनाबाधितांचा आकडा दोन हजारांवर पोहोचला आहे. त्यामुळे आता राज्याची कोरोनाबाधित रुग्णांची संख्या २ हजार ४०० इतकी झाली असून सोमवारी राज्यात ११ मृत्यूंची नोंद झाली आहे. यातील ९ मृत्यू मुंबईतील आहेत. त्यामुळे मुंबईतील बळींची संख्या १०१ झाली असून राज्यातील बळींचा आकडा १६२ वर पोहोचला आहे. त्यामुळे महामुंबईतील रुग्णसंख्या दोन हजारांजवळ पोहोचली असून मृतांचा आकडा ११९ वर गेला आहे.

सोमवारी दिवसभरात सर्वाधिक कोरोना रुग्णांचे निदान मुंबई शहरात झाले असून २४२ नव्या रुग्णांची नोंद झाली आहे, त्यामुळे शहराची एकूण रुग्णसंख्या १५४० वर पोहोचली आहे. मुंबई महानगरात कोरोनाचा वेगाने होणारा फैलाव धोकादायक ठरत आहे.
सोमवारी निदान झालेल्या एकूण ३५२ रुग्णांमध्ये मुंबईत २४२, पुणे महानगरपालिका क्षेत्रात ३९, अहमदनगर, धुळे, नाशिक, नवी मुंबई, पनवेल मनपा, रायगड, यवतमाळमध्ये प्रत्येकी एक रुग्ण आढळला आहे. मालेगावमध्ये १४,
कल्याण-डोंबिवलीत चार, मीरा-भार्इंदरमध्ये सात, नागपूरमध्ये ११, पिंपरी-चिंचवडमध्ये सहा, ठाण्यात नऊ, वसई-विरारमध्ये पाच नवे कोरोनाबाधित रुग्ण आढळून आले आहेत.

मुंबईत सोमवारी ९ मृत्यूंची नोंद
सोमवारी झालेल्या मृत्यूंमध्ये मुंबईचे ९ आणि पिंपरी-चिंचवड तसेच मीरा-भार्इंदर येथील प्रत्येकी १ रुग्ण आहे. यात ४ पुरुष तर ७
महिला आहेत. ६ जण हे साठ वर्षांवरील आहेत, ५ रुग्ण हे ४० ते ६० या वयोगटातील आहेत. या ११ जणांपैकी ८ रुग्णांमध्ये ७३ टक्के मधुमेह, उच्च रक्तदाब, अस्थमा, हृदयरोग असे आजार होते. राज्यातील मृत्यूंची संख्या आता १६० झाली आहे. रविवारी सोलापूरमध्ये पहिला मृत्यू झाल्यानंतर आरोग्य यंत्रणा युद्धपातळीवर काम करत आहे. रुग्णाच्या निवासी परिसरात ३५ हजार लोकांच्या सर्वेक्षणासाठी ६२ पथके कार्यरत आहेत.

न्यूयॉर्कमध्ये ७,८०० बळी
नवी दिल्ली : अमेरिकेत कोरोनाबाधित रुग्णांची संख्या ५ लाख, ६१ हजारांवर गेली असून आतापर्यंत २२ हजार १६० जण मरण पावले आहेत. त्यापैकी एकट्या न्यूयॉर्क शहरात ७ हजार, ८०० जण या संसर्गाने मृत्युमुखी पडले असून त्या शहरात रुग्णांचा आकडा १ लाख, ६० हजारावर गेला आहे. अनेक देशातील कोरोना रुग्णांच्या संख्येपेक्षा न्यूयॉर्कमधील हा आकडा खूपच मोठा आहे.

२५ जिल्ह्यांत नवा रुग्ण नाही
नवी दिल्ली: कोरोनाशी झुंजणाऱ्या देशवासीयांसाठी सकारात्मक बातमी आहे. गेल्या दोन आठवड्यांमध्ये देशातील २५जिल्ह्यांमध्ये कोरोनाचा एकही नवा रूग्ण आढळला नाही. महाराष्ट्रातील गोंदिया जिल्ह्याचा यात समावेश आहे. देशभरात ८५७ जण
कोरोनातून बरे झाले आहेत. रविवारी १४१ जण कोरोनामुक्त झालेत. देशात आतापर्यंत १० हजार ४५३ रुग्णांची नोंद करण्यात आली असून मृतांची
संख्या ३४२ आहे.

Web Title: Nearly 2,000 patients in Mahabharata; The death toll reaches 119

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.