मुंबई : सर्वोच्च न्यायालयाने हिरवा कंदील दाखविल्यानंतर नॅशनल एलिजिबिलिटी कम एन्ट्रन्स टेस्ट (नीट) ही परीक्षा आज (रविवार) होईल. एकाच सत्रात, एकाच दिवशी ही परीक्षा होणार असून, राज्यभरातून २ लाख २८ हजार ९१४ विद्यार्थी ही परीक्षा देतील. त्यासाठी ६९५ परीक्षा केंद्रांची व्यवस्था करण्यात आली आहे.कोरोना प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर परीक्षा केंद्रांवर तपासणी आणि सॅनिटायजेशनला प्राधान्य देण्यात आले आहे. विद्यार्थ्यांनी त्यांना प्रवेशपत्रावर दिलेल्या वेळेत परीक्षा केंद्रावर पोहोचावे. परीक्षा सुरू होण्याआधी किमान एक तास परीक्षा केंद्रावर उपस्थित असणे अपेक्षित आहे. विद्यार्थ्यांना परीक्षा केंद्रावर थ्री-प्लाय मास्कदेण्यात येतील. तसेच केंद्रावर दोन जणांमध्ये किमान ६ फुटांचे अंतर ठेवावे लागेल. मात्र मोठ्यासोलचे बूट, चप्पल, मोठ्या बटणांचे कपडे घालण्यास मनाई करण्यात आली आहे.परीक्षेसाठी जारी करण्यात आलेले मूळ ओळखपत्र विद्यार्थ्यांना जवळ बाळगायचे असून, कोणत्याही प्रकारची स्कॅन कॉपी किंवा मोबाइलमधील फोटो परीक्षा केंद्रांवर वैध मानले जाणार नाहीत, असे स्पष्ट करण्यात आले आहे.परीक्षार्थी विद्यार्थ्यांना लोकल प्रवासास परवानगी- विद्यार्थ्यांना परीक्षा केंद्रावर पोहोचायचे कसे, हा मोठा प्रश्न होता. शहरी तसेच ग्रामीण भागात विशेष गाड्या सोडून हा प्रश्न प्रशासनाने मार्गी लावावा, अशी मागणी पालकांकडून होत होती.- या पार्श्वभूमीवर अंतिम वर्षाच्या परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी आणि नीट परीक्षा देणाºया विद्यार्थ्यांसाठी मुंबई उपनगरी आणि मध्य रेल्वे प्रशासनाने लोकल प्रवासास परवानगी दिली आहे. महाविद्यालयाचे ओळखपत्र आणि प्रवेशपत्राच्या आधारे त्यांना परीक्षेच्या काळात लोकलने प्रवास करता येईल, असे रेल्वे प्रशासनाने स्पष्ट केले.सुरक्षेची भीतीपरीक्षेची तयारी झालीअसली तरी कोरोना प्रादुर्भावामुळे केंद्रावरील सुरक्षेबाबत काहीशी भीती वाटत आहे. प्रवासासाठी खासगी वाहनानेच जाणार असून, कोणत्याही प्रकारची रिस्क घेणार नाही.- स्वप्निल शिंदे, नीट परीक्षार्थी
‘नीट’ची परीक्षा आज, विद्यार्थ्यांना लोकल प्रवासास परवानगी
By ऑनलाइन लोकमत | Published: September 13, 2020 3:44 AM