Join us

नीट पीजीचे प्रवेशपत्र जाहीर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 07, 2021 4:09 AM

मुंबई : राष्ट्रीय पात्रता सह प्रवेश परीक्षा अर्थात नीट पीजी परीक्षा ११ सप्टेंबरपासून सुरू होणार आहे. परीक्षेला बसलेले उमेदवार ...

मुंबई : राष्ट्रीय पात्रता सह प्रवेश परीक्षा अर्थात नीट पीजी परीक्षा ११ सप्टेंबरपासून सुरू होणार आहे. परीक्षेला बसलेले उमेदवार ६ सप्टेंबरपासून त्यांचे प्रवेशपत्र डाउनलोड करू शकतील. ज्या उमेदवारांनी या परीक्षेसाठी यशस्वीरित्या नोंदणी केली आहे त्यांना प्रवेशपत्र डाउनलोड करण्यासाठी अधिकृत संकेतस्थळाला भेट देणे आवश्यक असणार आहे. राष्ट्रीय परीक्षा मंडळाकडून नीट पीजी २०२१ प्रवेशपत्र जाहीर करण्याच्या तारखेशी संबंधित घोषणा नुकतीच करण्यात आली. १८ एप्रिल २०२१ च्या परीक्षेसाठी यापूर्वी जाहीर करण्यात आलेली प्रवेशपत्रे वैध राहणार नसून नवीन प्रवेशपत्रे ६ सप्टेंबर रोजी अधिकृत संकेस्थस्थळावर जाहीर करण्यात येणार आहेत.

-----------------------

नोव्हेंबरमध्ये संशोधन आणि विकास मेळावा

लोकमत न्यूज नेटवर्क

मुंबई : देशातील २३ इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी (आयआयटी) या वर्षी नोव्हेंबरमध्ये संशोधन आणि विकास (आर अँड डी ) मेळाव्याचे आयोजन करणार आहे. उद्योग आणि शैक्षणिक क्षेत्रात अधिक सहभागासाठी एक व्यासपीठ मिळवून देणे हा यामगचा उद्देश असल्याचे केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी सांगितले. देशातील सर्व भारतीय तंत्रज्ञान संस्थांच्या (आयआयटी) संचालकांसोबत झालेल्या बैठकीत त्यांनी ही माहिती दिली. आयआयटीने आयोजित केलेला संशोधन आणि विकास मेळावा हा स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवाच्या पार्श्वभूमीवर महत्त्वाचा कार्यक्रम आहे. याद्वारे नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरणानुसार अत्याधुनिक संशोधनासाठी वातावरण निर्माण केले जाऊ शकणार आहे अशी चर्चा आहे.