प्रवेशाबाबत मार्गदर्शन हवंय? इथे संपर्क साधा; ४८ केंद्रांची नियुक्ती, मुंबईत १७ ठिकाणी

By ऑनलाइन लोकमत | Published: June 8, 2023 10:28 AM2023-06-08T10:28:06+5:302023-06-08T10:28:26+5:30

एकूण केंद्रांची संख्या ४८ आहे.

need guidance on admission contact here appointment of 48 centres 17 locations in mumbai | प्रवेशाबाबत मार्गदर्शन हवंय? इथे संपर्क साधा; ४८ केंद्रांची नियुक्ती, मुंबईत १७ ठिकाणी

प्रवेशाबाबत मार्गदर्शन हवंय? इथे संपर्क साधा; ४८ केंद्रांची नियुक्ती, मुंबईत १७ ठिकाणी

googlenewsNext

लोकमत न्यूज नेटवर्क, मुंबई : अकरावी ऑनलाइन प्रवेश प्रक्रियेत विद्यार्थ्यांना येणाऱ्या अडचणी आणि समस्या दूर करण्यासाठी शिक्षण उपसंचालक कार्यालयाच्या वतीने मार्गदर्शन केंद्रांची नियुक्ती करण्यात आली आहे. त्यात मुंबईतील दहावीच्या विद्यार्थ्यांना प्रवेश घ्यावयाचा असल्यास त्यांना त्यांच्या संबंधित माध्यमिक शाळांमध्ये मार्गदर्शन केले जाणार आहे, तर मुंबईबाहेरील दहावीच्या विद्यार्थ्यांना मुंबई महानगर क्षेत्रात प्रवेश घ्यावयाचा असल्यास त्यांना मार्गदर्शन केंद्र, विभागीय शिक्षण उपसंचालक कार्यालयातील प्रवेश नियंत्रण कक्षामध्ये मार्गदर्शन जाणार आहे. मुंबईत १७ मार्गदर्शन केंद्र असून, एकूण केंद्रांची संख्या ४८ आहे.

प्रवेश प्रक्रियेबाबत मार्गदर्शन करण्यासाठी विभागीय शिक्षण उपसंचालक कार्यालयामार्फत संपूर्ण मुंबई महानगरक्षेत्रामध्ये ४८ मार्गदर्शन केंद्र स्थापन करण्यात आली आहेत. प्रत्येक मार्गदर्शन केंद्रावर एक जबाबदार अधिकारी / कर्मचाऱ्यांची नियुक्ती केलेली आहे. तसेच विभागीय शिक्षण उपसंचालक कार्यालयामध्ये प्रवेशाच्या मार्गदर्शनाकरिता स्वतंत्र प्रवेश नियंत्रण कक्ष स्थापन करण्यात आला आहे. या प्रवेश नियंत्रण कक्षामार्फत विद्यार्थी व पालकांना ई-मेल (E-mail ID :- mumbai. 11thadmission@gmail.com), दूरध्वनी व प्रत्यक्ष आलेल्या विद्यार्थी व पालकांना मार्गदर्शन केले जाते.

इथेही मिळेल मदत

प्रवेश प्रक्रियेबाबत ९८२३००९८४१ या क्रमांकावरून विद्यार्थी व पालकांना ऑनलाइन मदतीसाठी हेल्प सेंटरची सुविधा उपलब्ध करून देण्यात आलेली आहे.

कोटानिहाय रिक्त जागा २३ जूनला होणार जाहीर

कोटानिहाय रिक्त जागांचा तपशील २३ जूनला प्रसिद्ध होईल. विद्यार्थ्यांनी सविस्तर वेळापत्रकासाठी https://11thadmission.org.in या लिंकचा वापर करावा. प्रवेश फेरी तीननंतर अल्पसंख्याक कोट्यातील रिक्त जागा ऑनलाइन प्रवेशासाठी वळविण्यात येणार आहेत.

विभाग                   मार्गदर्शन 
                           केंद्रांची संख्या
दक्षिण मुंबई     ५
उत्तर मुंबई    ६
पश्चिम मुंबई    ६
ठाणे मनपा    ४
कल्याण डोंबिवली मनपा    ४
मीरा भाईंदर मनपा    ८
नवी मुंबई मनपा    २
उल्हासनगर मनपा
अंबरनाथ, बदलापूर नपा    ३
भिवंडी तालुका    ३
वसई तालुका     ५
पनवेल तालुका    ३
पनवेल ग्रामीण    २
एकूण     ४८

 

Web Title: need guidance on admission contact here appointment of 48 centres 17 locations in mumbai

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.