विषमतामुक्त आर्थिक प्रगतीची आवश्यकता : मुनगंटीवार
By ऑनलाइन लोकमत | Published: October 27, 2018 11:08 PM2018-10-27T23:08:56+5:302018-10-27T23:09:33+5:30
विकासाची फळे समाजातील सर्व स्तरांत सारखी वितरित होतात किंवा नाही, हे पाहणे महत्त्वाचे असल्याचे प्रतिपादन अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी केले
मुंबई : आर्थिक प्रगतीबरोबर समाजाला विषमतामुक्तीकडे घेऊन जाणे गरजेचे आहे. विकासाची फळे समाजातील सर्व स्तरांत सारखी वितरित होतात किंवा नाही, हे पाहणे महत्त्वाचे असल्याचे प्रतिपादन अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी आय.आय.टी. पवई येथे झालेल्या ‘अलंकार- ग्लोबल लीडरशिप समिट’मध्ये केले.
मुनगंटीवार म्हणाले की, अर्थशास्त्राच्या सिद्धांतानुसार स्थूल राज्य उत्पन्न, सकल राष्ट्रीय उत्पन्न, दरडोई उत्पन्न, विकास दर यावरून देशाची प्रगती ठरते, पण आजही देशात तीन भारत राहतात. हिंदुस्थान, इंडिया आणि भारत यातील दरी सांधायची असेल, तर विषमतामुक्त देशाची निर्मिती व्हायला हवी. तशी व्यवस्था निर्माण करायला हवी. चालू वित्तीय वर्षाच्या पहिल्या तीन महिन्यांची जीएसटीच्या पहिल्या तीन महिन्यांशी तुलना करता महसूलात ३९ टक्क्यांनी वाढ नोंदवली गेली असल्याची माहितीही त्यांनी दिली.