महावितरणच्या कॉल सेंटरमध्ये ग्राहक क्रमाकांची एकदाच गरज

By admin | Published: May 24, 2014 07:45 PM2014-05-24T19:45:21+5:302014-05-24T22:53:12+5:30

महावितरणच्या कॉल सेंटरमध्ये ग्राहक क्रमाकांची एकदाच गरज

The need for a one-time customer order in the call center of MSEDCL | महावितरणच्या कॉल सेंटरमध्ये ग्राहक क्रमाकांची एकदाच गरज

महावितरणच्या कॉल सेंटरमध्ये ग्राहक क्रमाकांची एकदाच गरज

Next

मुंबई : वीज सेवेबाबत सर्व प्रकाराच्या तक्रारी दाखल करण्यासाठी महावितरणच्या टोल फ्री कॉल सेंटरमध्ये ग्राहकांना केवळ एकदाच ग्राहक क्रमांक नोंदवावा लागणार आहे. त्यानंतर रजिस्टर्ड केलेल्या कोणत्याही वैयक्तिक दूरध्वनी किंवा मोबाईल क्रमांकाहून कॉल सेंटरला तक्रार केल्यास फक्त तक्रारीचा तपशील सांगावा लागणार आहे. पुन्हा ग्राहक क्रमांक सांगावा लागणार नाही, अशी माहिती महावितरणाच्या वतीने देण्यात आली.
खंडीत वीजपुरवठासह सर्व प्रकाराच्या तक्रारी नोंदविण्यासाठी महावितरणने मध्यवर्ती तक्रार निवारण केंद्र सुरु केले आहे. येथे तक्रार नोंदविताना ग्राहक क्रमांक आवश्यक असतो. म्हणून ग्राहकांनी आपल्या मोबाईल, वैयक्तिक दूरध्वनीवरून महावितरणच्या टोल फ्री क्रमांकावर ग्राहक क्रमांक नोंदवावा. खंडीत वीज पुरवठयासह वीजसेवेबाबतच्या सर्व तक्रारी दाखल करण्यासाठी किंवा अन्य माहिती मिळविण्यासाठी राज्यभरातील ग्राहकांसाठी महावितरणने अत्याधुनिक मध्यवर्ती ग्राहक सेवा केंद्राचे १८००२००३४३५ आणि १८००२३३३४३५ हे दोन टोल फ्री क्रमांक ३६५ दिवस उपलब्ध करून दिले आहेत. तर स्थानिक तक्रार निवारण केंद्रे फ्रेबूवारीपासून कायमस्वरुपी बंद झाली आहेत.
शहरी आणि ग्रामीण भागातील वीजग्राहकांना कोणत्याही कंपनीच्या दूरध्वनी आणि मोबाईलवरून या टोल फ्री क्रमांकावर तक्रार नोंदविता येईल. तथापि प्रारंभी तक्रार नोंदविण्यासाठी ग्राहक क्रमांक देणे आवश्यक आहे. ही तक्रार नोंदविताना ग्राहकांना एकूण तीन मोबाईल किंवा दूरध्वनी क्रमांक नोंदविण्याची सोय आहे. त्यानंतर ग्राहकांनी या तीनपैकी कोणत्याही संपर्क क्रमांकाहून कॉल सेंटरशी संपर्क साधल्यास ग्राहकांना पुन्हा ग्राहक क्रमांक किंवा नाव, पत्ता आदी माहिती देणे गरजेचे राहणार नाही. ग्राहकांची माहिती आपोआप कॉल सेंटरच्या प्रतिनिधीला संगणकाद्वारे उपलब्ध होईल आणि ग्राहकांना केवळ तक्रारीचे स्वरुप सांगावे लागणार आहे. (प्रतिनिधी)

Web Title: The need for a one-time customer order in the call center of MSEDCL

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.