Join us

राज्यात ऑनलाइन विद्यापीठाची आवश्यकता, युवासेनेची मागणी

By ऑनलाइन लोकमत | Published: September 05, 2021 10:40 AM

कोविड काळात मागील २ वर्षांपासून राज्यातील शैक्षणिक संस्था बंद आहेत. या परिस्थितीत ऑनलाईन शिक्षण सुरु असून अनेक विद्यार्थ्यांना हे शिक्षण परवडण्यासारखे नाही.

लोकमत न्यूज नेटवर्क मुंबई : कोविड परिस्थितीत शिक्षणाच्या सर्वच क्षेत्रात आणि समाजातील विविध घटकांमध्ये ज्ञानाचा प्रसार, प्रचार करण्यासाठी ऑनलाईन तंत्रज्ञानाचे महत्त्व अधोरेखित झाले आहे. ऑनलाईन शिक्षण हे कठीण परिस्थितीत शिक्षणाची गुणवत्तावाढ आणि विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक विकासात महत्त्वाची भूमिका बजावू शकते. त्यामुळे ज्या विद्यार्थ्यांना ऑनलाईन शिक्षण परवडण्यासारखे आहे शिवाय ज्यांना दूरस्थ शिक्षण घ्यायचे आहे अशा विद्यार्थ्यांसाठी पूर्णतः ऑनलाईन विद्यापीठाच्या नव्या संकल्पनेची आणि त्या पार्श्वभूमीवर त्याची अमलबजावणी करण्यासाठी तशा विद्यापीठाची आवश्यकता असल्याचा प्रस्ताव युवासेनेमार्फत उच्च व तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत यांच्यासमोर सादर करण्यात आला आहे. युवासेना सचिव वरुण सरदेसाई आणि इतर सदस्यांनी राज्यात अशा ऑनलाईन विद्यापीठाची स्थापना व्हावी अशी मागणी या  केली आहे.

कोविड काळात मागील २ वर्षांपासून राज्यातील शैक्षणिक संस्था बंद आहेत. या परिस्थितीत ऑनलाईन शिक्षण सुरु असून अनेक विद्यार्थ्यांना हे शिक्षण परवडण्यासारखे नाही.

टॅग्स :वरुण सरदेसाईशिवसेनाउद्धव ठाकरेशिक्षण