Join us

जागतिक मानकांत उतरण्यास तयारीची गरज

By admin | Published: December 28, 2016 3:46 AM

‘उद्योग-व्यवसायातील जागतिक नामांकनात उतरण्यासाठी देशातील कंपन्या, व्यक्ती आणि सरकार अधिक तयार करण्याची आवश्यकता आहे. जागतिक स्तरावर स्पर्धा

मुंबई : ‘उद्योग-व्यवसायातील जागतिक नामांकनात उतरण्यासाठी देशातील कंपन्या, व्यक्ती आणि सरकार अधिक तयार करण्याची आवश्यकता आहे. जागतिक स्तरावर स्पर्धा मोठ्या प्रमाणात असल्यामुळे तयारीत कुठेतरी कमी पडत आहोत. देशातील उत्पादकता वाढवणे आवश्यक आहे. उत्पादकता वाढवण्यासाठी जागतिक मानकांचा अवलंब केला पाहिजे,’ असे प्रतिपादन उपराष्ट्रपती हमीद अन्सारी यांनी केले. मुंबईतील वर्ल्ड ट्रेड सेंटरमध्ये एम. विश्वेश्वरय्या स्मृती व्याख्यानमालेत उपराष्ट्रपती हमीद अन्सारी बोलत होते. या कार्यक्रमात ग्रामविकास आणि वस्तींमध्ये केलेल्या कार्याबद्दल राजश्री बिर्ला यांना उपराष्ट्रपतींच्या हस्ते डब्ल्यूटीसीए पुरस्कार देऊन गौरविण्यात आले. या वेळी शिक्षणमंत्री विनोद तावडे, वर्ल्ड ट्रेड सेंटर मुंबईचे अध्यक्ष कमल मोरारका, वर्ल्ड ट्रेड सेंटरचे गाझी अबू नाहल, वर्ल्ड ट्रेड सेंटर मुंबईचे उपाध्यक्ष विजय कलांत्री उपस्थित होते. उपराष्ट्रपती अन्सारी म्हणाले की, ‘वाढती व्यापारी तूट आणि लाखो रोजगारनिर्मिती करणे हे अर्थव्यवस्थेसमोरील मोठे आव्हान आहे. जागतिक स्तरावर स्पर्धेत उतरण्यासाठी आपल्याला उत्पादकता वाढवणे आवश्यक आहे. देशाचा आर्थिक विकास दर २००० -०५ या वर्षांत २ टक्क्यांनी वाढला होता. २००५-१० मध्ये हा दर ४.७ टक्के वाढला होता, पण चीनमध्ये आर्थिक विकास दर हा २६ टक्के इतका आहे.’ ‘देशाच्या प्रगतीसाठी उत्पादकतेकडे लक्ष दिले पाहिजे. तंत्रज्ञान जागतिकीकरणाचा मुख्य चालक आहे. सुरक्षेची हमी, उत्पादन आणि सेवेची गुणवत्ता याकडे लक्ष देऊन, आपण ज्या पर्यावरणात राहतो, त्याची गुणवत्ता वाढवणे आवश्यक आहे. जागतिक मानकांचे महत्त्व दिवसेंदिवस वाढते आहे, त्यामुळे त्याचा अवलंब केलाच पाहिजे. याचा फायदा आपल्याला निर्यातीसाठीही होणार आहे,’ असेही उपराष्ट्रपती अन्सारी यांनी स्पष्ट केले. (प्रतिनिधी)- ‘लहानपणापासूनच दुसऱ्यांना मदत करायचे संस्कार माझ्यावर झाले होते. चांगल्या भविष्यासाठी आजच काम केले पाहिजे. असे कार्य केल्यास पुढची पिढी मागे वळून पाहताना त्यांना चांगले वाटेल, या विचारातून प्रेरणा मिळेली,’ अशी प्रतिक्रिया राजश्री बिर्ला यांनी पुरस्कार स्वीकारताना व्यक्त केली.