Join us

महिलांचे प्रश्न सोडविण्यासाठी विशेष प्रयत्न गरजेचे - विजया रहाटकर

By admin | Published: May 08, 2017 4:58 AM

देशाच्या प्रगतीसाठी महिलांना सन्मानाने वागणूक दिली पाहिजे. आज देशभर ‘ट्रिपल तलाक’ची चर्चा होत आहे. या समस्येने अनेक

लोकमत न्यूज नेटवर्कमुंबई : देशाच्या प्रगतीसाठी महिलांना सन्मानाने वागणूक दिली पाहिजे. आज देशभर ‘ट्रिपल तलाक’ची चर्चा होत आहे. या समस्येने अनेक महिला रस्त्यावर येत आहेत. त्यांच्या समस्या सोडवून न्याय देणे गरजेचे आहे. महिलांशी संबधित प्रश्न सोडविण्यासाठी महिला आयोग सक्षम असून, त्यासाठी सर्व क्षेत्रातून एकत्रित प्रयत्न करणे गरजेचे आहे, असे राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा विजया रहाटकर यांनी आज येथे सांगितले.महाराष्ट्र राज्य महिला आयोग व भारतीय मुस्लीम महिला आंदोलन यांच्या संयुक्त विद्यमाने, ‘ट्रिपल तलाक’ याविषयी पीडित महिलांच्या समस्या व उपाययोजना या विषयावर चर्चासत्र शनिवारी पार पडले. त्या वेळी त्या बोलत होत्या. अशा समाजातील कुप्रथा बंद होणे गरजेचे आहे, असे त्या यावेळी म्हणाल्या.