गरज पडली की शरद पवारांचा सल्ला अन् कौतुक करायचं आणि नंतर... 

By ऑनलाइन लोकमत | Published: September 3, 2019 11:19 AM2019-09-03T11:19:18+5:302019-09-03T11:20:07+5:30

पक्षांतराच्या मुद्द्यावर बोलताना राष्ट्रवादी सोडून जाणाऱ्यांवर रोहित पवार यांनी घणाघात केला आहे.

Needed to appreciate Sharad Pawar, Rohit Pawar criticize BJP | गरज पडली की शरद पवारांचा सल्ला अन् कौतुक करायचं आणि नंतर... 

गरज पडली की शरद पवारांचा सल्ला अन् कौतुक करायचं आणि नंतर... 

Next

मुंबई - गरज पडली की साहेबांचा सल्ला, गरज पडली की बारामतीत येवून साहेबांच कौतुक करायचं आणि निवडणुकीची वेळ आली की त्यांनीच विचारायचं साहेबांनी काय केलं? अशा शब्दात राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि शरद पवारांचे नातू रोहित पवार यांनी भाजपाला टोला लगावला आहे. सोलापूर येथे केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या सभेत त्यांनी शरद पवारांवर टीका केली होती. त्यावर रोहित पवार यांनी भाष्य केलं आहे. 

रोहित पवार यांनी फेसबुकवर पोस्ट करत भाजपावर जोरदार टीका केली आहे. फेसबुक पोस्टमध्ये रोहित पवार म्हणतात की, डबल ढोल असतो. जो दोन्हीकडून वाजतो. समोरच्या पक्षाचं राजकारण नेहमीच डबल ढोल असल्यासारखं वाजत असत. पण आत्ता बस्स झालं. शरद पवारांचे राजकारण म्हणजे कुणीही उठावं आणि बोट दाखवाव अस निश्चितच नाही. गेल्या ५० वर्षात तीन पिढ्यांनी पाहिलेलं हे राजकारण आहे असं त्यांनी सांगितले आहे. 

त्याचसोबत शरद पवारांमुळे ज्याने शेतीतून चार पैसै कमावले त्यांच्या मुलाने तालुक्याच्या ठिकाणी चांगले शिक्षण घेवून नोकरी केली आणि त्याचा नातू आज IT कंपनीत नोकरी करु शकतो. शेती पासून ते IT पार्क उभा करण्यापर्यंतची ही शृंखला आहे. महिलांना समान संधी निर्माण करण्यापासून ते उपेक्षित व दिनदुबळ्या लोकांच्या पाठीमागे उभा राहण्याचा हा प्रवास आहे. प्रसंगी राजकारणाची तडजोड न करता पवारांनी वंचित व अल्पसंख्याक समाजासाठी घेतलेले निर्णय उभा महाराष्ट्र जाणतो. जातीपाती, धर्माधर्मात भांडण लावणारा नाही तर माणसं जोडणारा हा इतिहास आहे असं कौतुक रोहित पवार यांनी केलं आहे. 

पक्षांतराच्या मुद्द्यावर बोलताना राष्ट्रवादी सोडून जाणाऱ्यांवर रोहित पवार यांनी घणाघात केला आहे. सामान्य माणूस शरद पवारांच्या सोबत आहे तर घरात आमदारकी पासून खासदारकी आलेले नेतेमंडळी कुंपणावरून उड्या मारण्यात आघाडीवर आहेत. मध्यंतरी पिठ बदलण्याची भाषा आपण केली होती, जाड भरडं पीठ पण दुसऱ्या पक्षात गेलं अशी टीका करत आत्ता जमीनच नांगरायची वेळ आलेय. चांगली मशागत करुन ठेवूया असं आवाहन रोहित पवार यांनी कार्यकर्त्यांना केलं आहे. 

गेल्या काही दिवसांत राष्ट्रवादी काँग्रेसमधील अनेक बडे नेते पक्ष सोडून सत्ताधारी पक्षात प्रवेश करत आहे. मधुकर पिचड, चित्रा वाघ, शिवेंद्रराजे भोसले, राणा जगजितसिंह पाटील, धनंजय महाडीक, वैभव पिचड, दिलीप सोपल अशा बड्या नेत्यांना राष्ट्रवादी काँग्रेसला रामराम करत भाजपा-शिवसेनेत प्रवेश केला आहे. 

Web Title: Needed to appreciate Sharad Pawar, Rohit Pawar criticize BJP

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.