नीट-पीजी, २०२४ चार महिन्यांनी पुढे ढकलली; ३ मार्चऐवजी आता ७ जुलैला होणार

By रेश्मा शिवडेकर | Published: January 9, 2024 02:59 PM2024-01-09T14:59:20+5:302024-01-09T14:59:37+5:30

आधी जाहीर केलेल्या तारखेत बदल

NEET-PG, 2024 postponed by four months; Instead of March 3, it will be held on July 7 | नीट-पीजी, २०२४ चार महिन्यांनी पुढे ढकलली; ३ मार्चऐवजी आता ७ जुलैला होणार

नीट-पीजी, २०२४ चार महिन्यांनी पुढे ढकलली; ३ मार्चऐवजी आता ७ जुलैला होणार

मुंबई : 'नॅशनल बोर्ड ऑफ एक्झामिनेशन इन मेडिकल सायन्सेस'ने (एनबीईएमएस) ३ मार्चला अपेक्षित असलेली नीट-पीजी, २०२४ ही परीक्षा चार महिन्यांनी पुढे ढकलली आहे. सुधारित वेळापत्रकानुसार ही परीक्षा आता ७ जुलैला होणार आहे. 

बोर्डाने अधिसूचना काढत ऑगस्ट, २०२४ची  अपेक्षित कट-ऑफ तारीख देखील नमूद केली आहे. बोर्डाच्या अधिकृत अधिसूचनेनुसार १५ ऑगस्टला या परीक्षेची कटऑफ लागेल. 

नीट-पीजी ही वैद्यकीयच्या पदव्युत्तर अभासक्रमांच्या प्रवेशासाठी घेण्यात येते. या परीक्षेची पुनर्नियोजित तारीख ३ मार्च, २०२४ होती. परंतु नॅशनल मेडिकल कमिशनच्या सूचनेवरून परीक्षा पुढे ढकलण्यात आली आहे. 

परीक्षा देणार्‍या उमेदवारांना अधिक माहितीसाठी एनबीईएमएसची अधिकृत वेबसाइट नियमितपणे तपासण्याचा सल्ला देण्यात आला आहे.

Web Title: NEET-PG, 2024 postponed by four months; Instead of March 3, it will be held on July 7

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.