मुंबई : 'नॅशनल बोर्ड ऑफ एक्झामिनेशन इन मेडिकल सायन्सेस'ने (एनबीईएमएस) ३ मार्चला अपेक्षित असलेली नीट-पीजी, २०२४ ही परीक्षा चार महिन्यांनी पुढे ढकलली आहे. सुधारित वेळापत्रकानुसार ही परीक्षा आता ७ जुलैला होणार आहे.
बोर्डाने अधिसूचना काढत ऑगस्ट, २०२४ची अपेक्षित कट-ऑफ तारीख देखील नमूद केली आहे. बोर्डाच्या अधिकृत अधिसूचनेनुसार १५ ऑगस्टला या परीक्षेची कटऑफ लागेल.
नीट-पीजी ही वैद्यकीयच्या पदव्युत्तर अभासक्रमांच्या प्रवेशासाठी घेण्यात येते. या परीक्षेची पुनर्नियोजित तारीख ३ मार्च, २०२४ होती. परंतु नॅशनल मेडिकल कमिशनच्या सूचनेवरून परीक्षा पुढे ढकलण्यात आली आहे.
परीक्षा देणार्या उमेदवारांना अधिक माहितीसाठी एनबीईएमएसची अधिकृत वेबसाइट नियमितपणे तपासण्याचा सल्ला देण्यात आला आहे.