Join us

उपेक्षित मुलांना आरतीचा मान

By admin | Published: September 15, 2016 2:42 AM

देहविक्री करणाऱ्या मुलांना समाजात मानाचे स्थान मिळवून देण्यासाठी दादरच्या बाळगोपाळ मित्रमंडळाने मदतीचा हात पुढे केला आहे

मुंबई : देहविक्री करणाऱ्या मुलांना समाजात मानाचे स्थान मिळवून देण्यासाठी दादरच्या बाळगोपाळ मित्रमंडळाने मदतीचा हात पुढे केला आहे. अशा मुलांना एकत्र करून मंडळाच्या आरतीचा मान देण्याचा उपक्रम बाळगोपाळ मित्रमंडळाने राबवला आहे. या वेळी दादर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ अधिकारी शांतीलाल जाधव आणि पोलीस निरीक्षक संजय काटे उपस्थित होते.कामाठीपुरा येथे देहविक्री करणाऱ्या महिलांच्या मुलांचे सोशल अ‍ॅक्टिव्हिटीज इंटिग्रेशन ही संस्था संगोपन करते. या मुलांनाही गणेशोत्सवाचा आनंद मिळावा, यासाठी बाळगोपाळ मंडळाने बाप्पाच्या आरतीचा मान त्यांना दिला. बाळगोपाळ मंडळाने सावित्री नदीवरील दुर्घटनाग्रस्त प्रवाशांना श्रद्धांजली वाहणारा देखावा उभारला होता. समाजातील आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांना गणेशोत्सावाचा आनंद घेता यावा, यासाठी त्या मुलांना आरती देण्याचा निर्णय घेतल्याचे शांतीलाल जाधव यांनी सांगितले आहे. (प्रतिनिधी)