‘नेटफ्लिक्स’च्या व्यसनामुळे प्रेयसीकडे केले दुर्लक्ष; प्रेयसीने केला आत्महत्येचा प्रयत्न

By ऑनलाइन लोकमत | Published: October 29, 2018 02:05 AM2018-10-29T02:05:09+5:302018-10-29T06:47:34+5:30

केईएम रुग्णालयाच्या मानसोपचार विभागात उपचार सुरू

Neglected by Netflix addict; Precious girl tried suicide | ‘नेटफ्लिक्स’च्या व्यसनामुळे प्रेयसीकडे केले दुर्लक्ष; प्रेयसीने केला आत्महत्येचा प्रयत्न

‘नेटफ्लिक्स’च्या व्यसनामुळे प्रेयसीकडे केले दुर्लक्ष; प्रेयसीने केला आत्महत्येचा प्रयत्न

googlenewsNext

- स्नेहा मोरे 

मुंबई : स्मार्टफोन्सच्या दुनियेत आलेल्या ‘नेटफ्लिक्स’ अ‍ॅपने मुंबईतल्या एका तरुणाला व्यसनाधीन बनवले आहे. नेटफ्लिक्सच्या व्यसनामुळेच प्रेयसीकडे करत असलेल्या सततच्या दुर्लक्षामुळे प्रेयसीने थेट आत्महत्येचा प्रयत्न केला आहे. प्रियकराने केलेल्या सततच्या दुर्लक्षामुळे प्रेयसी नैराश्यावस्थेत गेली. त्याच मन:स्थितीतून तिने आत्महत्येचा प्रयत्नही केला. पश्चिम उपनगरात राहणाऱ्या त्या २४ वर्षीय तरुणीवर परळ येथील केईएमच्या मानसोपचार विभागात उपचार सुरू आहेत.

महाविद्यालयात वाणिज्य पदवीचे शिक्षण घेणाºया या मुलीला तिच्या पालकांनी रुग्णालयात दाखल केले आहे. अचानक बोलणे थांबविणे, टाळणे, वेळ देऊनही भेटायला न येणे, पे्रयसी म्हणून विशेष काळजी न घेणे, फोन कॉल्स टाळणे अशा प्रियकराच्या सततच्या वागण्यामुळे भावनिक पातळीवर खचलेल्या प्रेयसीने अखेर आत्महत्येचा मार्ग निवडल्याची माहिती केईएम रुग्णालयाच्या मानसोपचार विभाग प्रमुख डॉ. शुभांगी पारकर यांनी दिली. या तरुणीने आईच्या झोपेच्या गोळ्या खाऊन आत्महत्येचा प्रयत्न केल्याचे त्यांनी सांगितले. मात्र हा प्रयत्न फसला. तिच्या पालकांनी वेळीच तिची मन:स्थिती ओळखून तिला रुग्णालयात नेले. गेले तीन आठवडे तिच्यावर उपचार सुरू आहेत.

वेळीच ओळखा धोक्याची घंटा!
दिनक्रमातील रोजच्या गोष्टी थांबवून, त्यांचा क्रम मोडून अशा काही अ‍ॅप्सच्या आहारी जात असाल तर हे व्यसन आहे, हे वेळीच ओळखा.
कुटुंब-मित्रपरिवाराला वेळ न देणे, अभ्यास-काम न करणे, जेवण सोडून अ‍ॅपला वेळ देणे, जागरण करून अ‍ॅप पाहणे या सर्व सवयी व्यसन होण्याची लक्षणे आहेत. या अवस्थेत व्यसन ओळखले नाही, तर पुढे ती व्यक्ती थेट ‘रोबोटिक’ अवस्थेत जाऊन व्यसनाधीन होते. व्यसनाधीन असलेल्या ‘त्या’ तरुणावरही उपचार केले जाणार आहेत. पहिल्यांदा उपचाराच्या प्राथमिक टप्प्यावर त्याच्या व्यसनाधीनतेची अवस्था तपासली जाईल, अशी माहिती डॉ. पारकर यांनी दिली.

बंगळुरूमध्ये पहिला रुग्ण
आॅक्टोबर महिन्याच्या पहिल्या आठवड्यात देशातील नेटफ्लिक्सच्या व्यसनाला बळी गेलेला पहिला रुग्ण बंगळुरू येथे सापडला होता, त्याच्यावरही उपचार सुरू आहेत. त्यामुळे भविष्यात स्मार्टफोन्सवरील या स्ट्रीमिंग अ‍ॅपच्या व्यसनाचा धोका अधिक संभावण्याची चिन्हे आहेत, अशी चिंता वैद्यकीय तज्ज्ञांनी व्यक्त केली.

Web Title: Neglected by Netflix addict; Precious girl tried suicide

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.