नकार दिलेल्या शाळांनाही लसीकरण बंधनकारक

By ऑनलाइन लोकमत | Published: December 5, 2018 06:06 AM2018-12-05T06:06:24+5:302018-12-05T06:06:35+5:30

राज्यभरात २७ नोव्हेंबरपासून सुरू झालेल्या गोवर व रुबेला लसीकरणाने ६८ लाखांचा टप्पा गाठला आहे, अशी माहिती राज्याच्या सार्वजनिक आरोग्य विभागाने दिली आहे.

The neglected schools also have to be immunized | नकार दिलेल्या शाळांनाही लसीकरण बंधनकारक

नकार दिलेल्या शाळांनाही लसीकरण बंधनकारक

Next

मुंबई : राज्यभरात २७ नोव्हेंबरपासून सुरू झालेल्या गोवर व रुबेला लसीकरणाने ६८ लाखांचा टप्पा गाठला आहे, अशी माहिती राज्याच्या सार्वजनिक आरोग्य विभागाने दिली आहे. तर मुंबईतील शहर-उपनगरातील ९९८ शाळांमधील ३ लाख २२ हजार २४ बालकांना लसीकरण देण्यात आल्याची माहिती मुंबई महापालिकेच्या सार्वजनिक आरोग्य विभागाचे संयुक्त कार्यकारी आरोग्य अधिकारी डॉ. संतोष रेवणकर यांनी दिली. लसीकरण मोहिमेदरम्यान महापालिका वा राज्याच्या सार्वजनिक आरोग्य विभागाला नकार देणाऱ्या किंवा लसीकरणासाठी निश्चित दिवस न कळविलेल्या सर्व शाळांना लसीकरण बंधनकारक असल्याचेही त्यांनी सांगितले.
काही शाळांमधील विद्यार्थी अथवा त्यांच्या पालकांमध्ये गैरसमज असून, काही जण लसीकरणाच्या दिवशी आपल्या मुलांना शाळेत पाठवत नसल्याचेही दिसून आले आहे. मात्र, या लसीकरणाचे कोणतेही विपरीत परिणाम होत नाहीत, असे पालकांसह विद्यार्थ्यांना वारंवार सांगावे लागत आहे. भविष्यात गोवर अथवा रुबेला आजार होऊ नये, यासाठी हे लसीकरण गरजेचे असून, अफवांवर विश्वास ठेवू नये, असे आवाहन डॉ. रेवणकर यांनी केले आहे.
राज्यात सर्वत्र सरकारी, खासगी शाळांमध्ये, अंगणवाडी, सरकारी दवाखाने, आरोग्य उपकेंद्रे यांमध्ये हा उपक्रम राबविण्यात येत आहे. गोवरचे उच्चाटन व रुबेलावर नियंत्रण असे २०२० पर्यंतचे लक्ष्य समोर ठेवून ही राज्यव्यापी मोहीम सुरू करण्यात आली आहे. त्यामुळे दीड महिन्याची लसीकरणाची मोहीम असूनही कोणताही बालक वंचित राहू नये, याकरिता लसीकरण मोहिमेचा कालावधी वाढवण्यात येणार आहे, असेही डॉ. रेवणकर यांनी सांगितले.
>‘लसीकरणापासून कुणीही वंचित राहणार नाही’
लसीकरणासाठी तारीख न देणाºया शाळांनाही हे लसीकरण बंधनकारक केले असून, कोणतेही बालक लसीकरणापासून वंचित राहणार नाही, याची काळजी घेण्यात येणार आहे.

Web Title: The neglected schools also have to be immunized

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.