मुंबई : सन २०१६ - २०१७ या काळात नालयाच्या बांधकामात निष्काळजीपणा केल्याबाबत जे. बी. इन्फ्राटेक या कंत्राटदाराला ठोठाविण्यात आलेला १५ लाख रुपयांचा दंड मुंबई महानगरपालिकेने वसूल केला आहे. अशा आशयाचे पत्रच पालिकेने माहिती अधिकार कार्यकर्ता अंकुश वसंत कुराडे यांना पाठविले आहे.
लाल बहादूर शास्त्री मार्गावर शमशुद्दीन दर्गा परिसरात नाले रुंदीकरणाचे काम सुरु होते. यावेळी रुंदीकरणाच्या कामात १५ फेब्रूवारी २०१६ रोजी १५० मिली जलवाहिनी फुटली होती. त्यामुळे पाणी वाया जाण्यासह जलवाहिनीचे देखील नुकसान झाले होते. वाया गेलेले पाणी आणि जलवाहिनीच्या दुरुस्तीच्या कारणात्सव कंत्राटदाराला १५ लाख रुपयांचा दंड ठोठविण्यात आला होता.
विक्रोळी, भांडूप येथील कामाची बिले रोखून हा दंड करण्याबाबत पालिकेने स्पष्ट केले होते. कुराडे यांनी याबाबत महापालिकेकडे माहिती अधिकाराखाली माहिती मागितली होती. मात्र प्राप्त माहितीमध्ये दंड वसूल करण्यात आलेला नाही, असे निदर्शनास आले, असे कुराडे यांचे म्हणणे होते.