हार्टअ‍ॅटॅक आलेल्या वृद्धाला कोरोनाच्या संशयातून शेजाऱ्यांनी मदत नाकारली, ओढवला मृत्यू

By ऑनलाइन लोकमत | Published: April 14, 2020 03:35 AM2020-04-14T03:35:48+5:302020-04-14T03:36:46+5:30

लॉकडाऊन असल्याने नातेवाईक देखील अंत्ययात्रेला येऊ शकले नाहीत.

Neighbors deny help over coroner's suspicion over heart attack | हार्टअ‍ॅटॅक आलेल्या वृद्धाला कोरोनाच्या संशयातून शेजाऱ्यांनी मदत नाकारली, ओढवला मृत्यू

हार्टअ‍ॅटॅक आलेल्या वृद्धाला कोरोनाच्या संशयातून शेजाऱ्यांनी मदत नाकारली, ओढवला मृत्यू

Next

मुंबई : वेळेवर उपचार न मिळाल्याने चेंबूर येथील एका वृद्धाला प्राण गमवावे लागले आहेत. चेंबूरच्या सिंधी कॅम्प परिसरात राहणारे समीर नासकर (६१) यांना १० एप्रिल रोजी सायंकाळच्या सुमारास हृदयविकाराचा झटका आला. समीर यांना सायन रुग्णालयात घेऊन जाण्याकरिता त्यांच्या पत्नीने शेजाऱ्यांकडे दार ठोठावत मदत मागितली. मात्र समीर हे कोरोना बाधित असल्याचा संशयावरून शेजाºयांनी मदत नाकारली. यामुळे रुग्णवाहिका येण्यासही उशीर झाला. वेळेत उपचार न मिळाल्याने रविवारी सायन रुग्णालयात त्यांचा मृत्यू झाला. समीर यांचा मृतदेह घरी आणला असता त्यांचा कोरोनाने मृत्यू झाल्याची अफवा परिसरात पसरल्याने कोणीही मदतीला पुढे आले नाही.

लॉकडाऊन असल्याने नातेवाईक देखील अंत्ययात्रेला येऊ शकले नाहीत. यावेळी परिसरातील समाजसेवक रेतीवाला शौकत भाई व राजभाई यांनी मायलेकींना मदत केली. यानंतर पित्याच्या मृतदेहाला आई आणि मुलगी मोनिका नासकर यांनीच खांदा दिला व चरई स्मशानभूमीत अंत्यसंस्कार केले.
 

 

Web Title: Neighbors deny help over coroner's suspicion over heart attack

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.