नेपीयन सी रोड मुंबईत सर्वात महागडे

By admin | Published: January 12, 2015 02:16 AM2015-01-12T02:16:21+5:302015-01-12T02:16:21+5:30

रेडी रेकनरने केलेल्या दरवाढीनंतर घरांच्या किमती वाढणार असतानाच नव्या दरपत्रकानुसार मुंबईतील सर्वाधिक दर मलबार व खंबारा हिल येथील नेपीयन सी रोडवरील घरांना मिळाला आहे

Nepalese Sea Road is the most expensive in Mumbai | नेपीयन सी रोड मुंबईत सर्वात महागडे

नेपीयन सी रोड मुंबईत सर्वात महागडे

Next

चेतन ननावरे, मुंबई
रेडी रेकनरने केलेल्या दरवाढीनंतर घरांच्या किमती वाढणार असतानाच नव्या दरपत्रकानुसार मुंबईतील सर्वाधिक दर मलबार व खंबारा हिल येथील नेपीयन सी रोडवरील घरांना मिळाला आहे. तर शहरात धारावी आणि उपनगरांत कुर्ला येथील घरे सर्वात स्वस्त असल्याची माहिती मिळाली आहे.
रेडी रेकनरच्या दरपत्रकानुसार उच्चभ्रू लोकांची वस्ती असलेल्या नेपीयन सी रोडमधील भुलाबाई देसाई रोडवरील घरांना प्रतिचौरस मीटरला ८ लाख ५० हजार रुपये दराने नोंदणी व मुद्रांक शुल्काचा भरणा करावा लागणार आहे. रेडी रेकनरने येथील एका ३०० चौरस/फुटाच्या सदनिकेची किंमत सुमारे २ कोटी ३६ लाख ९० हजार ३५० रुपये ठरवल्याचे निदर्शनास  येते. याउलट शहरातील धारावी विभागामधील घरांना सर्वात कमी म्हणजेच प्रतिचौरस मीटरसाठी ६४ हजार रुपयांचा दर ठरवला आहे.
परिणामी येथील गृहखरेदी करणाऱ्यांना सर्वात कमी नोंदणी व मुद्रांक शुल्क भरणा करावा लागणार आहे. नव्या दरानुसार येथील ३०० चौरस फुटाच्या घराची किंमत १७ लाख ८३ हजार ७४४ रुपये ग्राह्य धरण्यात आली आहे. मुळात उपनगरांतील घरांच्या किमती झपाट्याने वाढत असतानाच रेडी रेकनरच्या दरपत्रकात मात्र शहराच्या तुलनेत उपनगरांतील घरांच्या किमती फारच कमी दाखवल्या आहेत. पूर्व उपनगरांतील कुर्ला विभागामधील मान बुद्रुक, मंडाले, तुर्भे, नानोले येथील घरांचा भाव प्रतिचौरस मीटरसाठी ४० हजारांहून कमी दाखवण्यात आला आहे. म्हणजेच येथील ३०० चौरस फुटाच्या घराची किंमत केवळ ११ लाख १४ हजार ८४० रुपयांहून कमी दाखवली आहे.

Web Title: Nepalese Sea Road is the most expensive in Mumbai

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.