Join us  

नेपाळचे पंतप्रधान चीनची रखेल, अयोध्येवरून बरळणाऱ्या ओलींविरोधात शिवसेनेचा घणाघात

By ऑनलाइन लोकमत | Published: July 19, 2020 7:58 AM

शिवसेना नेते आणि सामनाचे कार्यकारी संपादक संजय राऊत यांनी आज सामनामध्ये प्रसिद्ध झालेल्या लेखामधून नेपाळचे पंतप्रधान केपी शर्मा ओली यांच्यावर बोचरी टीका केली आहे.

ठळक मुद्देनेपाळचे पंतप्रधान के.पी. शर्मा ओली हे दखलपात्र राजकारणी नाहीत. भारतविरोधी वक्तव्यांमुळे ते सध्या चर्चेत आहेत. ओली हे हिंदू असले तरी ते चीनचे हस्तक आहेत. चीनची रखेल असल्याप्रमाणे त्यांचे वर्तन आहेते नेपाळच्या पंतप्रधानपदी राहावेत, यासाठी चीन मोठ्या प्रमाणावर पैसा खर्च करत आहे

मुंबई - एकेकाळी घनिष्ठ मित्र असलेल्या भारत आणि नेपाळ यांच्यातील संबंध गेल्या काही दिवसांत कमालीचे बिघडले आहेत. दरम्यान, भारतीय भूमीवर दावा करून नेपाळच्या नकाशात बदल करण्याची आगळीक केल्यानंतर आता नेपाळचे पंतप्रधान के.पी. शर्मा ओली यांनी भारतातील सांस्कृतिक वारशावरही आघात करण्यास सुरुवात केली आहे. भारतीय जनमानसात पुजनीय असलेले भगवान श्रीराम हे नेपाळी होते, तसेच भारतातील अयोध्या ही नकली असून, खरी अयोध्या नेपाळमध्ये असल्याचा दावा ओली यांनी काही दिवसांपूर्वी केला होता. दरम्यान, श्रीराम आणि अयोध्येवरून बरळणाऱ्या नेपाळच्या पंतप्रधानांवर शिवसेनेने घणाघाती टीका केली आहे.

शिवसेना नेते आणि सामनाचे कार्यकारी संपादक संजय राऊत यांनी आज सामनामध्ये प्रसिद्ध झालेल्या लेखामधून नेपाळचे पंतप्रधान केपी शर्मा ओली यांच्यावर बोचरी टीका केली आहे. नेपाळचे पंतप्रधान के.पी. शर्मा ओली हे दखलपात्र राजकारणी नाहीत. भारतविरोधी वक्तव्यांमुळे ते सध्या चर्चेत आहेत. भारतात जी अयोध्या आहे ती नकली आहे, खरी अयोध्या नेपाळमध्ये आहे आणि राम नेपाळी आहे, असे विधान त्यांनी केले आहे. मात्र हे विधान गांभीर्याने घेण्याची गरज नाही. मात्र ज्या देशाची संस्कृती आणि श्रद्धा हिंदुत्वाशी निगडित आहेत, त्या देशाच्या पंतप्रधानांनी असे विधान करावे याचे आश्चर्य वाटते. मात्र ओली हे हिंदू असले तरी ते चीनचे हस्तक आहेत. चीनची रखेल असल्याप्रमाणे त्यांचे वर्तन आहे. ते नेपाळच्या पंतप्रधानपदी राहावेत, यासाठी चीन मोठ्या प्रमाणावर पैसा खर्च करत आहे. खुद्द ओलींच्या परदेशी खात्यात ४५ कोटी जमा झाल्याचे पुरावे समोर आले आहेत, अशा ओलींनी भारतविरोधी भूमिका घेणे स्वाभाविक आहे, असा टोला संजय राऊत यांनी लगावला आहे.

राम अयोध्येत जन्मले तर ते नेपाळमध्ये स्वयंवरासाठी कसे आले, असा सवाल त्यांनी विचारलाय, खरंतर ओली यांनी रामायण वाचले पाहिजे. रामाने अयोध्येतून दक्षिणेत दंडकारण्य, रामटेक, पंचवटी, रामेश्वरम आणि रावणाशी युद्ध करण्यासाठी लंकेपर्यंत धडक मारली. त्यांच्यासाठी नेपाळमधील जनकपूर येथे जाणे काय कठीण होते? नेपाळचे पंतप्रधान सरळसरळ चीनचे हस्तक झाले आहेत. चीन नेपाळच्या माध्यमातून भारतात धार्मिक अस्वस्थता पसरवत आहेत. राम जन्मला कुठे हा वाद नेपाळ निर्माण करतोय. रामाची सीता कोण, असे विचारण्याचाच हा प्रकार आहे,  असेही राऊत यांनी म्हटले आहे.

सीतामाईचे माहेत नेपाळमध्ये आहे. रामाची पावले त्या भूमीवर उमटली म्हणून ते पहिले हिंदुराष्ट्र ठरले. पण जेथे राम जन्मला ती अयोध्या आणि भारत मात्र धर्मनिरपेक्ष बनले. आज नेपाळवरही चीनच्या लालभाईने झडप मारली आणि ते हिंदुराष्ट्र संपवले. आथा ओलीसारखे लोक तिथे असल्यावर दुसरे काय व्हायचे? अशी टीकाही राऊत यांनी केली आहे.

इतर महत्त्वाच्या बातम्या 

coronavirus: धक्कादायक! कोरोनाच्या रिपोर्टमध्ये केले गोलमाल, डॉक्टर झाला मालामाल

भारतानंतर आता या देशाने चीनला दाखवली सैनिकी तादक, घुसखोरीला चोख प्रत्युत्तर देण्याचा दिला इशारा

 महिंद्रांनी सुरक्षा दलांसाठी आणले दणकट चिलखती अस्र; आता माओवादी, दहशतवाद्यांची खैर नाही

…म्हणून भारतातील दहा पैकी तीन कोरोना रुग्ण करू शकत नाहीत प्लाझ्मा दान

coronavirus: कोरोनाबाधित रुग्णाचे तब्बल दीड कोटींचे बिल केले माफ, तिकीट देऊन केली मायदेशी पाठवणी

गेल्या सहा महिन्यांत कोरोनाबाबत तज्ज्ञांना मिळाली ही महत्त्वाची माहिती, लस आणि हर्ड इम्युनिटीबाबत मिळाले असे संकेत…

'सोनेरी' हॉटेल; दारं-खिडक्याच काय, टॉयलेटसुद्धा सोन्याचं! अशा आहेत सुख-सुविधा...

टॅग्स :अयोध्याभारतनेपाळचीनशिवसेनासंजय राऊत