नेरळ-माथेरान मिनी ट्रेन शनिवारपासून प्रवाशांच्या सेवेत

By नितीन जगताप | Published: November 2, 2023 10:01 PM2023-11-02T22:01:41+5:302023-11-02T22:01:59+5:30

पर्यटकांना मोठा दिलासा मिळणार

Neral-Matheran mini train in passenger service from Saturday | नेरळ-माथेरान मिनी ट्रेन शनिवारपासून प्रवाशांच्या सेवेत

नेरळ-माथेरान मिनी ट्रेन शनिवारपासून प्रवाशांच्या सेवेत

मुंबई : माथेरानची राणी म्हणून ओळख असलेल्या नेरळ-माथेरान मिनी ट्रेनची थेट शनिवार ४, नोव्हेबरपासून पुन्हा प्रवाशांचा सेवेत दाखल होणार आहे. दिवाळीत पर्यटकांना मोठा दिलासा मिळणार आहेत.

माथेरान हे मुंबई महानगरातील आणि पुण्यातील पर्यटकांसाठी सर्वाधिक जवळचे थंड हवेचे ठिकाण आहे. त्यामुळे अनेक पर्यटक एक दिवसीय किंवा काही दिवसीय सहलीचे नियोजन करतात. पर्यटकांना येथील मिनी ट्रेनचेही खूप आकर्षण आहे. मात्र,पावसाळ्यात दरड कोसळण्याच्या भितीने आणि पर्यटकांची सुरक्षा लक्षात घेऊन मध्य रेल्वे दरवर्षी मान्सून काळात खबरदारीचा उपाय म्हणून नेरळ-माथेरान मिनी ट्रेनची सेवा बंद करण्यात येते. आता पुन्हा शनिवारपासून नेरळ ते माथेरान दरम्यान थेट मिनी ट्रेन सुरु करण्यात येत आहे. त्यामुळे दिवाळीत माथेरानला फिरायला येणाऱ्या प्रवासी,पर्यटकांना मोठा दिलासा मिळणार आहे.

डाऊन मार्ग
नेरळ- माथेरान
सकाळी.७ वाजता- सकाळी१०.४०वाजता
सकाळी.८.५०वाजता-----सकाळी ११.३०वाजता
सकाळी १०.२५वाजता---- दुपारी १.०५ वाजता

अप मार्ग
माथेरान-नेरळ
दुपारी १२.२५वाजता-दुपारी ४.३०वाजता
दुपारी.२.४५वाजता-संध्याकाळी ५.३०वाजता
दुपारी ४ वाजता--संध्याकाळी ६.४०वाजता

Web Title: Neral-Matheran mini train in passenger service from Saturday

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Mumbaiमुंबई