मुंबई : माथेरानची राणी म्हणून ओळख असलेल्या नेरळ-माथेरान मिनी ट्रेनची थेट शनिवार ४, नोव्हेबरपासून पुन्हा प्रवाशांचा सेवेत दाखल होणार आहे. दिवाळीत पर्यटकांना मोठा दिलासा मिळणार आहेत.
माथेरान हे मुंबई महानगरातील आणि पुण्यातील पर्यटकांसाठी सर्वाधिक जवळचे थंड हवेचे ठिकाण आहे. त्यामुळे अनेक पर्यटक एक दिवसीय किंवा काही दिवसीय सहलीचे नियोजन करतात. पर्यटकांना येथील मिनी ट्रेनचेही खूप आकर्षण आहे. मात्र,पावसाळ्यात दरड कोसळण्याच्या भितीने आणि पर्यटकांची सुरक्षा लक्षात घेऊन मध्य रेल्वे दरवर्षी मान्सून काळात खबरदारीचा उपाय म्हणून नेरळ-माथेरान मिनी ट्रेनची सेवा बंद करण्यात येते. आता पुन्हा शनिवारपासून नेरळ ते माथेरान दरम्यान थेट मिनी ट्रेन सुरु करण्यात येत आहे. त्यामुळे दिवाळीत माथेरानला फिरायला येणाऱ्या प्रवासी,पर्यटकांना मोठा दिलासा मिळणार आहे.डाऊन मार्गनेरळ- माथेरानसकाळी.७ वाजता- सकाळी१०.४०वाजतासकाळी.८.५०वाजता-----सकाळी ११.३०वाजतासकाळी १०.२५वाजता---- दुपारी १.०५ वाजताअप मार्गमाथेरान-नेरळदुपारी १२.२५वाजता-दुपारी ४.३०वाजतादुपारी.२.४५वाजता-संध्याकाळी ५.३०वाजतादुपारी ४ वाजता--संध्याकाळी ६.४०वाजता