कर्जत : कर्जत आगारातील महत्त्वाचे असलेल्या नेरळ एसटी स्थानकाची अवस्था बिकट झाली आहे. सध्या पाऊस सुरू असल्याने येथे चिखलाचे साम्राज्य निर्माण झाले आहे. बाजूच्या लोकवस्तीमधील सांडपाणी आणि कचरा यांचा सर्वत्र वावर दिसून येत आहे. हे गेली अनेक वर्षे सुरू आहे. त्यातच प्रवाशी आणि एसटीचे कर्मचारी यांना बसण्यासाठी साधा निवारा शेड नसल्याने सर्वांचे हाल होत आहेत. नेरळ एसटी स्थानकातून तालुक्यात एसटी गाड्या सोडल्या जात असतात. साधारण १०० फेऱ्या नेरळ एसटी स्थानकातून विविध मार्गावर होत असतात. त्यामुळे दिवसभर वर्दळ असते. नेरळ स्थानकात केवळ एक टपरी वजा कार्यालय आहे, अशा अर्धवट अवस्थेतील नेरळ एसटी स्थानकात सध्या पावसाच्या पाण्यामुळे निर्माण झालेल्या डबक्यातून प्रवाशांना मार्ग काढावा लागत आहे. (वार्ताहर) एसटी स्थानकाच्या जमिनीचा प्रश्न गेल्या अनेक वर्षांपासून प्रलंबित आहे. त्यामळे महामंडळाची जागा नसल्याने तेथे कोणतीही कामे करण्यात अडचणी निर्माण होत आहेत.- एस. टी. देशमुख, प्रभारी आगारप्रमुख, नेरळ
नेरळ एसटी स्थानक चिखलात
By admin | Published: July 01, 2015 10:42 PM