नेरळ-माथेरान मिनी ट्रेन पुन्हा घसरली  

By ऑनलाइन लोकमत | Published: December 22, 2018 07:00 AM2018-12-22T07:00:36+5:302018-12-22T07:00:59+5:30

शुक्रवारी सकाळी १० वाजून ३५ मिनिटांनी नेरळहून माथेरानला जाणारी मिनी ट्रेन घसरली. ट्रेन जुम्मापट्टी आणि वॉटर पाइपलाइन या स्थानकांदरम्यान असताना एका बोगीची दोन चाके रुळावरून घसरली.

 The Nerald-Matheran Mini train again dropped | नेरळ-माथेरान मिनी ट्रेन पुन्हा घसरली  

नेरळ-माथेरान मिनी ट्रेन पुन्हा घसरली  

googlenewsNext

मुंबई : शुक्रवारी सकाळी १० वाजून ३५ मिनिटांनी नेरळहून माथेरानला जाणारी मिनी ट्रेन घसरली. ट्रेन जुम्मापट्टी आणि वॉटर पाइपलाइन या स्थानकांदरम्यान असताना एका बोगीची दोन चाके रुळावरून घसरली. त्यानंतर रेल्वे कर्मचारी आणि अधिकाऱ्यांनी दीड तासांनंतर या बोगीची चाके रुळावर आणत गाडी पुन्हा सुरू केली. गुरुवारी याच स्थानकांदरम्यान ट्रेनची चाके घसरल्याची घटना घडली.
शुक्रवारी प्रवासी बोगीची दोन चाके घसरली. यामध्ये कोणालाही दुखापत झाली नसल्याचे रेल्वे अधिकाºयांनी सांगितले. गुरुवारी लगेज बोगीची दोन चाके घसरली होती. माथेरानची राणी म्हणून प्रसिद्ध असलेली मिनी ट्रेन घसरण्याचे प्रमाण वाढले आहे. मागील पंधरा दिवसांमध्ये हा तिसरा अपघात आहे. ८ डिसेंबरला वातानुकूलित बोगीसह नेरळ-माथेरान ट्रेन धावली. ९ डिसेंबरला बोगीची चाके रुळांवरून घसरली. २० डिसेंबर रोजी लगेज बोगीची चाके घसरली, तर शुक्रवारी प्रवासी बोगीची चाके घसरली. त्यामुळे माथेरान ट्रेनला सातत्याने अपघाताला सामोरे जावे लागत आहे. नेरळ-माथेरान ट्रेन २०१५ साली सलग दोन अपघात झाल्यानंतर दुरुस्तीच्या कारणानिमित्त दीड वर्ष बंद ठेवण्यात आली होती. त्यानंतर पुन्हा अपघाताची मालिका सुरू झाली आहे. दरम्यान, नेरळ-माथेरान रेल्वे सेवा सुरळीत झाली आहे. 

Web Title:  The Nerald-Matheran Mini train again dropped

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.