- अजय परचुरेमुंबई : मुंबईला विस्तीर्ण समुद्रकिनारा लाभला आहे. मात्र मुंबईतील या अथांग पसरलेल्या समुद्रकिनाऱ्याला प्रदूषणाचा फटकाही तितकाच सहन करावा लागतोय. मुंबईत दररोज १० हजार टन कचरा गोळा केला जातो. मात्र यातील बहुतांश कचरा अनेक वाटांनी समुद्रातच परत येतो. यावर तोडगा काढण्यासाठी महापालिकेने समुद्रात नदी, नाल्यांद्वारे येणा-या कच-याला थोपविण्यासाठी लोखंडी जाळ्या उभारणे गरजेचे आहे. मात्र या लोखंडी जाळ्या उभारण्यात मुंबई पालिका टाळाटाळ करीत असल्याचे चित्र समोर आले आहे. राष्ट्रीय हरित लवादासमोर झालेल्या सुनावणीत ही बाब गुरुवारी प्रकर्षाने पुढे आली.वनशक्ती संघटनेने मुंबईतील समुद्रकिनाºयांचे प्रदूषणापासून संरक्षण होण्यासाठी महापालिका, महाराष्ट्र प्रदूषण नियामक मंडळ यांच्याविरोधात हरित लवादाकडे याचिका दाखल केली होती. यावर झालेल्या सुनावणीत महाराष्ट्र प्रदूषण नियामक मंडळाने प्रदूषण रोखण्यास कमी पडत असल्याची कबुली लवादाकडे केली. मात्र महापालिकेने आपली बाजू मांडण्यासाठी आणखी १० दिवसांची मुदत मागितली आहे. त्यामुळे मुंबईतील समुद्रकिनाºयांना प्रदूषणापासून रोखण्यासाठी करण्यात येणाºया उपाययोजनांसाठी महापालिकाच अडचणीचे जाळे उभे करीत असल्याचे चित्र आहे.याचिकेत म्हटल्याप्रमाणे मुंबईतील घराघरांतून बाहेर पडणारी विषारी प्रदूषके सांडपाण्यातून, लहान नाल्यांतून, ड्रेनेजमधून सरळ समुद्रात येतात. घरात व इतरत्र होणारा घनकचरा गोळा करून डम्पिंग ग्राउंडवर नेला तरी मुंबईतील ही कचरा भरावक्षेत्रे खाड्यांच्या आसपासच आहेत. तिथल्या भरती-ओहोटीच्या पाण्याबरोबर हा कचरा समुद्रात जातो. या कचºयातून धूळ उडू नये म्हणून त्यावर मारण्यात येणाºया पाण्याने आणि पावसाने हा कचरा आणि त्यातील असंख्य गोष्टी समुद्राला सामावून घ्याव्या लागतात. यात निरूपद्रवी असणाºया प्लॅस्टिकच्या पिशव्या, काचा, पत्र्याचे डबे किंवा इलेक्ट्रॉनिक वस्तूंचे तुकडे हे सर्व समुद्रात जात असतात. यातील अनेक पदार्थ हे समुद्राच्या पाण्यात विरघळतात किंवा त्या वस्तूंचे कण पाण्यावर तरंगतात आणि समुद्राला आणखी प्रदूषित करतात. समुद्रातील हा कचरा समुद्र लाटांसोबत किनाºयावर आणून मुंबईकरांना साभार परत करतो.यावर नियंत्रण मिळविण्यासाठी तसेच मुंबईतील नाल्यांमधून येणाºया कचºयाला रोखण्यासाठी लोखंडी जाळ्या महापालिकेने उभारणे गरजेचे आहे. यामुळे हा कचरा अडकून नंतर तो एकाचवेळी महापालिकेला एकत्र करून डम्पिंग करता येईल आणि समुद्रात होणाºया प्रदूषणाला आळा बसेल. मात्र तसे होताना दिसत नाही. हरित लवादाने याबद्दल महापालिकेला विचारणा केली असता आपली बाजू मांडण्यासाठी आणखी १० दिवसांची मुदत पालिकेने मागितली आहे. तर महाराष्ट्र प्रदूषण महामंडळाने आपली चूक मान्य करीत योग्य उपाययोजना करण्याची ग्वाही हरित लवादाला दिली आहे.दहा दिवसांत उत्तर अपेक्षितहरित लवादासमोर मांडलेल्या याचिकेमध्ये समुद्रात जाणाºया सांडपाण्याविषयीही माहिती देण्यात आली आहे. महापालिकेने मुंबईत ८ ठिकाणी मलनिस्सारण उदंचन केंद्रे उभारली आहेत. या केंद्रांवर २,६७१ एमएलडी सांडपाण्यावर पुन:प्रकिया दररोज होणे अपेक्षित आहे. मात्र या ८ केंद्रांतील ३ केंद्रे सोडली तर बाकी केंद्रांवर हे काम नीट होत नसल्याचेही याचिकाकर्त्यांनी हरित लवादाच्या निदर्शनास आणून दिले. यावरही महापालिकेला पुढच्या दहा दिवसांत उत्तर देणे अपेक्षित आहे.मुंबई महापालिकेने समुद्रकिनाºयांवरील प्रदूषण रोखण्यासाठी प्रयत्न करणे गरजेचे आहे. लोखंडी जाळ्या न उभारता कधीतरी समुद्रकिनारा स्वच्छतेचे कार्यक्रम करून फोटो काढण्याचे काम महापालिकेने बंद करावे. लोखंडी जाळ्या उभारण्यात अडचणी असल्यास आम्ही स्वयंसेवी संस्था महापालिकेला लोखंडी जाळ्या पुरविण्यास तयार आहोत. मात्र त्यांनी यासाठी किमान पुढाकार तरी घ्यावा अशी आमची हरित लवादासमोर मागणी आहे. - डी.स्टॅलिन, प्रकल्प संचालक, वनशक्ती
पालिकाच उभारतेय अडचणींचे ‘जाळे’; हरित लवादासमोर प्रदूषण मंडळाचा माफीनामा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 06, 2018 3:13 AM