लोकमत न्यूज पुरस्कारमुंबई : भाषेला तंत्रज्ञानाची जोड देण्यासाठी डॉ. होमी भाभा राज्य विद्यापीठाने पुढाकार घेतला असून यंदापासून न्यूरो लिंग्विस्टिक कम्प्युटिंग हा नव्या काळाशी सुसंगत अभ्यासक्रम सुरू केला जाणार आहे. त्यामुळे या विद्यापीठांतर्गत एल्फिन्स्टन कॉलेजातील मराठी विभागातील विद्यार्थ्यांना नव्या रोजगारसंधी उपलब्ध होतील.
नव्या शैक्षणिक धोरणांतर्गत भाषा आणि तंत्रज्ञान यांच्या संगमातून हा नवा अभ्यासक्रम तयार केला आहे. त्यातून विद्यार्थ्यांना भाषिक डेटा विश्लेषण, यंत्रमानवांसाठी संवाद प्रणाली, भाषांतर तंत्रज्ञान, मानवी मेंदू आणि संगणकीय प्रणाली यांच्यातील संबंध समजण्याची संधी मिळेल. त्यातून भाषिक अभ्यासक्रम शिकणाऱ्या या विद्यार्थ्यांना संगणक प्रणालीतील कोडिंग जमत नसले तरी या युगातील रोजगारसंधींची द्वारे खुली होतील, अशी माहिती कुलगुरु प्रा. डॉ. रजनीश कामत यांनी दिली.
ऑन जॉब ट्रेनिंगची संधीया अभ्यासक्रमाचा कालावधी ६ ते १२ महिन्यांचा असेल. त्यामध्ये विद्यार्थ्यांना तांत्रिक आणि व्यावहारिक प्रशिक्षण देण्यासह ऑन जॉब ट्रेनिंगची संधीही दिली जाईल. तसेच या अभ्यासक्रमाचे वर्ग ऑनलाइन आणि ऑफलाइन या दोन्ही पद्धतीत भरणार आहेत. तसेच भाषिक अभ्यासक्रमाच्या विद्यार्थ्यांसह अन्य विद्यार्थीही या अभ्यासक्रमाला प्रवेश घेऊ शकतील, अशी माहिती अधिकाऱ्यांनी दिली.
काय फायदे मिळणार?डिजिटल मार्केटिंग, डेटा ॲनालिटिक्स, आर्टिफिशियल इंटेलिजन्स आणि संगणकीय भाषाविज्ञान आदी क्षेत्रांत नोकऱ्यांची संधी वाढेल.डेटा सायन्स आणि भाषा विश्लेषणाच्या माध्यमातून उद्योगांसाठी कौशल्याधारित लोक तयार होतील. कॉर्पोरेट कंपन्यांमध्ये कामासाठी कौशल्यविकास. उच्चशिक्षणासाठी संशोधनाच्या संधी मिळणार.