पालिका रुग्णालयात नवे ७६ व्हेंटिलेटर्स

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 20, 2019 02:54 AM2019-02-20T02:54:39+5:302019-02-20T02:55:03+5:30

तुटवडा संपणार : गरजू रुग्णांची होणार सोय

New 76 ventilators in the hospital | पालिका रुग्णालयात नवे ७६ व्हेंटिलेटर्स

पालिका रुग्णालयात नवे ७६ व्हेंटिलेटर्स

Next

मुंबई : पालिका रुग्णालयांतील अतिदक्षता विभागांमध्ये उपलब्ध व्हेंटिलेटर्सच्या तुलनेत रुग्णांची संख्या अधिक आहे. त्यामुळे व्हेंटिलेटर्सअभावी गरजू रुग्णांना खाजगी रुग्णालयात पाठवावे लागते. गरीब रुग्णांना खाजगी रुग्णालयातील ही सेवा परवडणारी नाही. त्यामुळे गरजू रुग्णांना दिलासा देण्यासाठी महापालिका रुग्णालयांत लवकरच ७६ नवे व्हेंटिलेटर्स आणण्यात येणार आहेत.

महापालिकेच्या प्रमुख रुग्णालयांमध्ये देशाच्या कानाकोपऱ्यातून गरीब रुग्ण उपचारासाठी येत असतात. केईएम, सायन या रुग्णालयांत तज्ज्ञ डॉक्टर असल्यामुळे अत्यवस्थ स्थितीत असलेल्या रुग्णांना येथे आणण्यात येते. मात्र अनेकवेळा रुग्णांची संख्या आणि पालिका रुग्णालयांमध्ये उपलब्ध व्हेंटिलेटर्सची संख्या यात मोठी तफावत असते. यामुळे व्हेंटिलेटर्स वेळेत उपलब्ध न झाल्यास ही दिरंगाई एखाद्या रुग्णाच्या जीवावर बेतण्याची शक्यता अधिक असते.

आरोग्याच्या अर्थसंकल्पात वाढ करताना ही गैरसोय दूर करण्याचा निर्णय महापालिकेने घेतला आहे. त्यानुसार ७६ नवीन व्हेंटिलेटर्स घेण्यात येत आहेत. यासाठी तब्बल नऊ कोटी १८ लाख रुपये खर्च करण्यात येणार आहेत. पालिकेच्या प्रत्येक रुग्णालयात अतिदक्षता विभागांमधील खाटांच्या क्षमतेनुसार व्हेंटिलेटरचा पुरवठा करण्यात येणार आहे.

तंत्रज्ञानाच्या तुलनेत रुग्णसंख्या अधिक
च्पालिकेची ३ प्रमुख रुग्णालये व १७ उपनगरीय रुग्णालये आहेत. या रुग्णालयांमध्ये सध्या साडेचारशे व्हेंटिलेटर्स आहेत.
च्पालिका रुग्णालयांमध्ये दरवर्षी उपचार घेणाºया रुग्णांची संख्या कोट्यवधींच्या घरात आहे. यापैकी अत्यवस्थ रुग्णांची संख्या आणि उपलब्ध व्हेंटिलेटर्सच्या संख्येत मोठी तफावत आहे.
च्पालिकेला प्रौढांसाठी १३५ तर लहान मुलांसाठी ५३ अशा १८८ व्हेंटिलेटर्सची गरज होती. त्यानुसार परळ येथील केईएम रुग्णालयात १३, सायन रुग्णालयात २८, नायर दंत महाविद्यालय आणि रुग्णालय एक, नाक-कान-घसा रुग्णालयात एक आणि उपनगरीय रुग्णालयांमध्ये ३३ व्हेंटिलेटर्स देण्यात येणार आहेत.

Web Title: New 76 ventilators in the hospital

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.