भुयारी मार्गाला जोडणारी नवी एसी बससेवा सुरू; वांद्रे रेल्वे स्थानकाजवळील सुविधेने दिलासा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 18, 2024 13:53 IST2024-12-18T13:52:46+5:302024-12-18T13:53:26+5:30

वांद्रे रेल्वे स्थानक ते वांद्रे वसाहत मेट्रो स्थानकांदरम्यान ए-३१४ ही वातानुकूलित बससेवा सुरू केली आहे. 

new ac bus service connecting to the metro starts | भुयारी मार्गाला जोडणारी नवी एसी बससेवा सुरू; वांद्रे रेल्वे स्थानकाजवळील सुविधेने दिलासा

भुयारी मार्गाला जोडणारी नवी एसी बससेवा सुरू; वांद्रे रेल्वे स्थानकाजवळील सुविधेने दिलासा

लोकमत न्यूज नेटवर्क, मुंबई : कुलाबा-वांद्रे-आरे मेट्रो ३ भुयारी मार्गिकेवरील पहिल्या टप्प्यातील आरे ते बीकेसीदरम्यानचा प्रवास सुकर करण्यासाठी मुंबई मेट्रो रेल कॉर्पोरेशन (एमएमआरसी) आणि बेस्टचे प्रयत्न सुरू आहेत. त्यानुसार जेव्हीएलआर मेट्रो स्थानकावर थांबे निश्चित केल्यानंतर बेस्टने मंगळवारपासून वांद्रे रेल्वे स्थानक ते वांद्रे वसाहत मेट्रो स्थानकांदरम्यान ए-३१४ ही वातानुकूलित बससेवा सुरू केली आहे. 

आरे-बीकेसी भुयारी मेट्रो सेवेला दोन महिने पूर्ण होऊनही प्रवाशांकडून प्रतिसाद मिळत नसल्याचे निदर्शनास आले आहे. मेट्रो स्थानकांपर्यंत पोहोचण्यासाठी बेस्ट बससेवा नसल्याने प्रवाशांची गैरसोय होते. रिक्षा-टॅक्सीचा महागडा पर्याय स्वीकारून पुढे मेट्रोने प्रवास करणे प्रवाशांना परवडणारे नाही. त्यामुळे भुयारी मेट्रोकडे प्रवासी पाठ फिरवत आहेत. ही बाब लक्षात घेऊन एमएमआरसी बेस्ट प्रशासनाकडे पाठपुरावा करत आहे.

अशी धावणार बस 

ए-३१४ ही वातानुकूलित मिडी प्रकाराची बस असून वांद्रे पूर्व रेल्वे स्थानक, अनंत काणेकर मार्ग, भास्कर न्यायालय, सर अलियावर जंग महामार्ग, कलानगर, खान अब्दुल गफार खान मार्ग, भारत नगर जंक्शन, इंडियन ऑईल, बीकेसी कनेक्टर जंक्शन, स्वावलंबन भवन, मुंबई क्रिकेट असोसिएशन, सीए इन्स्टिट्यूट, कौटिल्य भवन, डायमंड मार्केट, हिंदुस्थान पेट्रोलियम अधिकारी वसाहत, वाल्मीकीनगर, डॉ. बाबासाहेब आंबेडकर नगर आणि वांद्रे वसाहत मेट्रो स्थानक असा या बसचा मार्ग असेल.

या बसमुळे प्रवाशांना दिलासा

काही दिवसांपूर्वीच जेव्हीएलआर मेट्रो स्थानकाबाहेर बेस्ट बस क्रमांक ३०७, ४२५, ४२८, ४१६, ५२२ सह अन्य काही बसचे थांबे देण्यात आले, तर मंगळवारपासून वांद्रे पूर्वेकडे रेल्वे स्थानक ते वांद्रे वसाहत मेट्रो स्थानकाद- रम्यान वातानुकूलित बससेवा सुरू करण्यात आली आहे. आणिक आगारातील बेस्ट बस क्रमांक ए-३१४ वातानुकूलित बस सकाळी ७:३० ते रात्री ८ या वेळेत आठवड्याचे सातही दिवस धावणार आहे
 

Web Title: new ac bus service connecting to the metro starts

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :BESTबेस्ट