Join us

रेल्वे प्रवाशांसाठी ‘१३९’ नवा मदतकार्य क्रमांक

By ऑनलाइन लोकमत | Published: December 25, 2019 5:44 AM

प्रशासनाकडून सुरक्षेला प्राधान्य; १ जानेवारीपासून सेवा सुरू

मुंबई : रेल्वे प्रवाशांच्या सुरक्षेसाठी आणि मदतीसाठी रेल्वे प्रशासनाकडून ‘१३९’ हा नवा क्रमांक प्रवाशांसाठी उपलब्ध करून दिला आहे. या क्रमांकावर संपर्क साधल्यास रेल्वे मदतकार्य, भारतीय रेल्वेबाबतची चौकशी करता येणार आहे. रेल्वे हेल्पलाइन क्रमांक १८२ आणि इतर चौकशी करण्यासाठी एकात्मिक हेल्पलाइन क्रमांक १३९ प्रवाशांसाठी उपलब्ध आहेत.

१ जानेवारी २०२०पासून १३९ क्रमांकाची सेवा सुरू होणार आहे. एकात्मिक हेल्पलाइन क्रमांक १३९ आणि रेल्वे, आरपीएफ सुरक्षा हेल्पलाइन क्रमांकासाठी १८२ क्रमांकावर प्रवासी संपर्क करू शकतात.१ जानेवारी २०२० पासून हे क्रमांक बंद

कॅटरिंग सर्व्हिेसेस - १८००१११३२१अपघात / सुरक्षा- १०७२एसएमएस तक्रारी- ९७१७६३०९८२सामान्य तक्रारी- १३८दक्षता- १५२२१०क्लीन माय कोच- ५८८८/१३८१ जानेवारी २०२०पासून हे क्रमांक सुरूएकात्मिक रेल्वे हेल्पलाइन - १३९रेल्वे, आरपीएफ सुरक्षा हेल्पलाइन नंबर - १८२

टॅग्स :मुंबईरेल्वे