न्यू अमरावती मध्य रेल्वेचे तिसरे गुलाबी स्थानक

By नितीन जगताप | Published: August 9, 2023 01:14 PM2023-08-09T13:14:56+5:302023-08-09T13:15:45+5:30

या स्थानकाचे संपूर्णपणे व्यवस्थापन महिला कर्मचारी करतात.

New Amravati 3rd Pink Station of Central Railway | न्यू अमरावती मध्य रेल्वेचे तिसरे गुलाबी स्थानक

न्यू अमरावती मध्य रेल्वेचे तिसरे गुलाबी स्थानक

googlenewsNext

मुंबई : मध्य रेल्वेचे 'न्यू अमरावती स्थानक' हे भुसावळ विभागातील पहिले स्थानक आणि गुलाबी स्थानक बनणारे मध्य रेल्वेचे तिसरे स्थानक आहे . या स्थानकाचे संपूर्णपणे व्यवस्थापन महिला कर्मचारी करतात.

महिला कर्मचाऱ्यांना समान संधी उपलब्ध करून देण्यात मध्य रेल्वे नेहमीच अग्रेसर असते. सर्व महिला व्यवस्थापित स्थानक - मुंबई विभागातील माटुंगा स्थानक आणि त्यानंतर नागपूर विभागातील अजनी स्थानक स्थापन करणारे भारतीय रेल्वेचे पहिले झोन असण्याचा मान आहे.

मध्य रेल्वेने महिला सक्षमीकरणाच्या दिशेने एक पाऊल पुढे टाकले असून, भुसावळ विभागातील सर्व महिला व्यवस्थापित स्थानक म्हणून न्यू अमरावती स्थानक स्थापन करण्यात आले आहे. भुसावळ विभागातील पहिले "पिंक स्टेशन" आणि संपूर्णपणे महिला कर्मचार्‍यांकडून व्यवस्थापित केले जाणारे मध्य रेल्वेचे तिसरे स्थानक असलेल्या न्यू अमरावती स्थानकात ४ उप स्टेशन अधीक्षक, ४ पॉइंट वुमन, ३ रेल्वे सुरक्षा कर्मचारी आणि १ स्टेशन तिकीट बुकिंग एजंट, १२ महिला कर्मचारी कर्मचारी आहेत.स्टेशनवर दररोज अंदाजे ३८० प्रवासी येतात आणि दररोज १० ट्रेन चालवल्या जातात.

Web Title: New Amravati 3rd Pink Station of Central Railway

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.