कला संस्कृती जपण्यासाठी नव्या कलाकारांनी पुढाकार घ्यावा

By ऑनलाइन लोकमत | Published: January 8, 2020 05:19 AM2020-01-08T05:19:01+5:302020-01-08T05:19:12+5:30

कलाविश्वात काम करीत असताना युवक आणि महिला कलाकारांनी व्यापक दृष्टिकोन बाळगुन कला, संस्कृती जपण्यासाठी पुढाकार घ्यावा

New artists should take the initiative to preserve the art culture | कला संस्कृती जपण्यासाठी नव्या कलाकारांनी पुढाकार घ्यावा

कला संस्कृती जपण्यासाठी नव्या कलाकारांनी पुढाकार घ्यावा

Next

मुंबई : कलाविश्वात काम करीत असताना युवक आणि महिला कलाकारांनी व्यापक दृष्टिकोन बाळगुन कला, संस्कृती जपण्यासाठी पुढाकार घ्यावा, असे प्रतिपादन राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांनी केले. कुलाबा येथील जहांगिर आर्ट गॅलरीत आयोजित कला संचालनालयाच्या वतीने आयोजित ६० व्या महाराष्ट्र राज्य कला प्रदर्शनाचे उद्घाटन राज्यपालांच्या हस्ते झाले. त्यावेळी ते बोलत होते. राज्यपाल कोश्यारी म्हणाले, कलाकार हा ईश्वराची देणगी आहे. कला ही प्रत्येकाला विकसीत करीत असते. कलाकारांनी नेहमी व्यापक दृष्टिकोन बाळगणे तितकेच महत्वाचे आहे. त्यांच्या दृष्टिकोनातून समाजाला नवी दिशा मिळते. त्यामुळे अशा कलाकारांच्या कलागुणांना प्रोत्साहित करणे गरजेचे असून त्यासाठी व्यासपीठ उपलब्ध करुन दिले गेले पाहिजे.

कलाक्षेत्रात महिलांचाही सहभाग वाढत आहे. त्यामुळे शासनाने महिलांच्याही कलागुणांना प्रोत्साहन देवून त्यांना पुढे आणावे. व्यक्तीमध्ये दडलेल्या विविध कलागुणांना वाव देणे आवश्यक आहे. तसेच या क्षेत्रातील नवीन कलाकारांनी पुढे येऊन कला विश्वात अमूल्य योगदान द्यावे, अशी अपेक्षाही त्यांनी यावेळी व्यक्त केली. नागपूर येथील ९३ वर्षीय ज्येष्ठ चित्रकार व शिक्षक अरुण मोरघडे यांना राज्य प्रदर्शनातील विशेष पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. यंदाच्या कला प्रदर्शनातील उत्कृष्ट कलाकृतींसाठी १५ युवा कलाकारांना राज्यपालांच्या हस्ते पुरस्कार देण्यात आले. यावेळी राज्यपालांच्या हस्ते स्मरणिकेचे प्रकाशन झाले. तसेच, २०-२० च्या कला प्रदर्शनातील विजेत्यांना पुरस्कार देऊन सन्मानित करुन कलाकारांच्या कलेचा देशभरात सन्मान व्हावा, अशी अपेक्षा राज्यपाल कोश्यारी यांनी व्यक्त केली. या कला प्रदर्शन कार्यक्रमाप्रसंगी उच्च व तंत्रशिक्षण विभागाचे सचिव सौरभ विजय, कला संचालनालयाचे संचालक राजीव मिश्रा यांच्यासह पुरस्कार प्राप्त विजेत्यांचे कुटुंबीय मोठ्या संख्येने उपस्थित होते.
>पदमसी यांना वासुदेव गायतोंडे कला जीवनगौरव पुरस्कार
वासुदेव गायतोंडे कला जीवनगौरव पुरस्काराने सन्मानित झालेले पद्मभूषण अकबर पद्मसी यांचे सोमवारी निधन झाल्याबद्दल राज्यपाल यांनी दु:ख व्यक्त करुन त्यांना श्रद्धांजली वाहिली. पाच लाख रुपये व स्मृतीचिन्ह असलेला हा पुरस्कार कलारक्षक अभिजीत गोंडकर यांनी स्वीकारला.

Web Title: New artists should take the initiative to preserve the art culture

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.