बच्चू येणार ‘हसणाऱ्या’ ॲम्ब्युलन्सने घरी, जूनपासून सुरुवात मुंबईतून 

By ऑनलाइन लोकमत | Published: May 28, 2023 07:22 AM2023-05-28T07:22:27+5:302023-05-28T07:23:00+5:30

नंतर राज्यात विस्तार

new born babies will come home in a smiling ambulance starting from June from Mumbai | बच्चू येणार ‘हसणाऱ्या’ ॲम्ब्युलन्सने घरी, जूनपासून सुरुवात मुंबईतून 

बच्चू येणार ‘हसणाऱ्या’ ॲम्ब्युलन्सने घरी, जूनपासून सुरुवात मुंबईतून 

googlenewsNext

मुंबई : ॲम्ब्युलन्सच्या सायरनचा धडकी भरवणारा आवाज, ॲम्ब्युुलन्समधील तणावाचे वातावरण याऐवजी बाळाच्या गोड आवाजाचा सायरन, आत रंगीबेरंगी चित्रे, मंद संगीताची सोबत असे आल्हाददायक वातावरण असेल तर? बाळंतीण आणि बाळालाही असा आनंद देणाऱ्या ‘खिलखिलाहट ॲम्ब्युलन्स’ मुंबईच्या रस्त्यावर लवकरच दिसतील. 

नरेंद्र मोदी मुख्यमंत्री असताना गुजरातेत ‘खिलखिलाहट ॲम्ब्युलन्स’ सेवा सुरू झाली हाेती. ही सेवा आता आधी मुंबईत सुरू हाेईल व नंतर राज्यभर विस्तार करण्यात येईल. 

या कामीही होणार उपयोग...
महिलेला बाळंतपणासाठी वा गरोदरपणाच्या काळात काही त्रास झाला तर  इस्पितळात पोहोचविण्यासाठी. बाळ आजारी असल्यास इस्पितळात नेण्यासाठी. 
बाळ-बाळंतिणीला आनंददायी वातावरणात घरी पोहोचविण्यासाठी पहिल्या टप्प्यात पाच ॲम्ब्युलन्स रुजू होतील. ही सेवा विनामूल्य असेल.

जून अखेरीस ही सेवा मुंबईत सुरू करण्याचे बैठकीत ठरले. मुंबईनंतर राज्याच्या अन्य भागातही ही सेवा सुरू करण्याचा मानस आहे. 
मंगलप्रभात लोढा,
महिला, बालकल्याण मंत्री

काय असेल ॲम्ब्युलन्सच्या आत...

  • एरवी रस्त्यावरून जाणाऱ्या ॲम्ब्युलन्सचा सायरन अनेकांच्या हृदयात धडकी भरवतो. गरोदर महिलेवर वा नवजात शिशूवरही त्याचा परिणाम होऊ शकतो. म्हणून या ॲम्ब्युलन्सचा आवाज हा लहान मुलाच्या हसण्याचा असेल. आतमध्ये छान छान चित्रे असतील अन् खेळणीही. 
  • ॲम्ब्युलन्सच्या दर्शनी भागावरही रंगीबेरंगी चित्रे असतील. आत नवजात शिशूंना टप्प्याटप्प्याने देण्यात येणाऱ्या लसींबाबतची माहिती लावलेली असेल. तसेच जवळपासच्या इस्पितळांची माहितीही दिलेली असेल.

Web Title: new born babies will come home in a smiling ambulance starting from June from Mumbai

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Mumbaiमुंबई