‘त्या’ पुलालगतचा नवा पूल प्रवाशांच्या सेवेत, एल्फिन्स्टन दुर्घटना : रेल्वेने ‘बडेजाव’ टाळला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 2, 2018 05:16 AM2018-01-02T05:16:36+5:302018-01-02T05:16:59+5:30

एल्फिन्स्टन दुर्घटनेला कारणीभूत ठरलेल्या दादर दिशेकडील पुलाच्या पायºयांशेजारी नव्या पायºया उभारण्यात आल्या आहेत. एल्फिन्स्टन दुर्घटनेला तब्बल तीन महिने उलटल्यानंतर या पाय-या उभारण्यात आल्या.

 The new bridge of the 'Pulalagat' passenger service, the Elphinstone accident: the railways avoided 'Badgeao' | ‘त्या’ पुलालगतचा नवा पूल प्रवाशांच्या सेवेत, एल्फिन्स्टन दुर्घटना : रेल्वेने ‘बडेजाव’ टाळला

‘त्या’ पुलालगतचा नवा पूल प्रवाशांच्या सेवेत, एल्फिन्स्टन दुर्घटना : रेल्वेने ‘बडेजाव’ टाळला

Next

मुंबई : एल्फिन्स्टन दुर्घटनेला कारणीभूत ठरलेल्या दादर दिशेकडील पुलाच्या पायºयांशेजारी नव्या पायºया उभारण्यात आल्या आहेत. एल्फिन्स्टन दुर्घटनेला तब्बल तीन महिने उलटल्यानंतर या पाय-या उभारण्यात आल्या. मात्र, कोणत्याही स्वरूपाचा ‘बडेजाव’ न करता प्रवासी सेवेत हा पूल दाखल केल्यामुळे प्रवाशांमधून समाधान व्यक्त होत आहे.
एल्फिन्स्टन येथील निमुळत्या पायºयांमुळे चेंगराचेंगरीची घटना घडली होती. यात २३ प्रवाशांचा मृत्यू तर ३९ प्रवासी जखमी झाले होते. अपघातग्रस्त पुलाला लागून नवा पूल उभारल्यामुळे प्रवाशांना याचा फायदा होणार आहे. चढ-उतार करण्यासाठी दोन स्वतंत्र मार्ग या पुलामुळे उपलब्ध झाले आहेत. या पुलासाठी पश्चिम रेल्वे तिकीट खिडकी पाडली. नोव्हेंबर २०१७ मध्ये या पायºयांच्या कामाला सुरुवात झाली. या पायºयांसाठी १७ लाख रुपये खर्च आल्याची माहिती रेल्वे सूत्रांनी दिली. सद्य:स्थितीत परळ टर्मिनसचे काम सुरू आहे. त्याचबरोबर १२ मीटर लांबीच्या एल्फिन्स्टन स्थानकाला जोडणाºया पादचारी पुलाचेदेखील काम सुरू आहे. परिणामी भविष्यात एल्फिन्स्टन दुर्घटनेची पुनरावृत्ती होणार नसल्याची माहिती रेल्वे सूत्रांनी दिली.
 

Web Title:  The new bridge of the 'Pulalagat' passenger service, the Elphinstone accident: the railways avoided 'Badgeao'

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.