Join us

‘त्या’ पुलालगतचा नवा पूल प्रवाशांच्या सेवेत, एल्फिन्स्टन दुर्घटना : रेल्वेने ‘बडेजाव’ टाळला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 2, 2018 05:16 IST

एल्फिन्स्टन दुर्घटनेला कारणीभूत ठरलेल्या दादर दिशेकडील पुलाच्या पायºयांशेजारी नव्या पायºया उभारण्यात आल्या आहेत. एल्फिन्स्टन दुर्घटनेला तब्बल तीन महिने उलटल्यानंतर या पाय-या उभारण्यात आल्या.

मुंबई : एल्फिन्स्टन दुर्घटनेला कारणीभूत ठरलेल्या दादर दिशेकडील पुलाच्या पायºयांशेजारी नव्या पायºया उभारण्यात आल्या आहेत. एल्फिन्स्टन दुर्घटनेला तब्बल तीन महिने उलटल्यानंतर या पाय-या उभारण्यात आल्या. मात्र, कोणत्याही स्वरूपाचा ‘बडेजाव’ न करता प्रवासी सेवेत हा पूल दाखल केल्यामुळे प्रवाशांमधून समाधान व्यक्त होत आहे.एल्फिन्स्टन येथील निमुळत्या पायºयांमुळे चेंगराचेंगरीची घटना घडली होती. यात २३ प्रवाशांचा मृत्यू तर ३९ प्रवासी जखमी झाले होते. अपघातग्रस्त पुलाला लागून नवा पूल उभारल्यामुळे प्रवाशांना याचा फायदा होणार आहे. चढ-उतार करण्यासाठी दोन स्वतंत्र मार्ग या पुलामुळे उपलब्ध झाले आहेत. या पुलासाठी पश्चिम रेल्वे तिकीट खिडकी पाडली. नोव्हेंबर २०१७ मध्ये या पायºयांच्या कामाला सुरुवात झाली. या पायºयांसाठी १७ लाख रुपये खर्च आल्याची माहिती रेल्वे सूत्रांनी दिली. सद्य:स्थितीत परळ टर्मिनसचे काम सुरू आहे. त्याचबरोबर १२ मीटर लांबीच्या एल्फिन्स्टन स्थानकाला जोडणाºया पादचारी पुलाचेदेखील काम सुरू आहे. परिणामी भविष्यात एल्फिन्स्टन दुर्घटनेची पुनरावृत्ती होणार नसल्याची माहिती रेल्वे सूत्रांनी दिली. 

टॅग्स :एलफिन्स्टन चेंगराचेंगरीमुंबईभारतीय रेल्वे