Join us

अत्याधुनिक तंत्रज्ञानाने युक्त नवी बम्बार्डिअर आज मुंबईत येणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 06, 2018 6:07 AM

लोकलमधील महिला सुरक्षिततेसाठी रेल्वे प्रशासन विशेष खबरदारी घेत आहे. त्यानुसार महिला बोगीत सीसीटीव्ही कार्यरत असलेली पहिली बम्बार्डिअर लोकल मंगळवारी (उद्या) मुंबईत दाखल होणार आहे.

महेश चेमटे मुंबई : लोकलमधील महिला सुरक्षिततेसाठी रेल्वे प्रशासन विशेष खबरदारी घेत आहे. त्यानुसार महिला बोगीत सीसीटीव्ही कार्यरत असलेली पहिली बम्बार्डिअर लोकल मंगळवारी (उद्या) मुंबईत दाखल होणार आहे. या लोकलमध्ये अत्याधुनिक तंत्रज्ञानाच्या मदतीने वीज कमी वापरणारे पंखे आणि अन्य उपकरणांचा समावेश आहे. लोकलमध्ये महिला सुरक्षेसह एलईडी दिव्यांचीही व्यवस्था आहे.चेन्नई येथील इंटिग्रल कोच फॅक्टरीमध्ये बम्बार्डिअर लोकलची बांधणी करण्यात आली आहे. सर्व महिला बोगींत सीसीटीव्ही हे थेट कोच फॅक्टरीतूनच बसविण्यात आले आहेत. त्याचबरोबर ‘लो कंझ्युम पॉवर’ या आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर केला आहे. सामान्य लोकलमधील ट्युबलाईटच्या जागी या लोकलमध्ये एलईडी दिवे कार्यान्वित करण्यात आले आहेत. ही लोकल सध्या भुसावळ येथे पोहोचली असून नियोजित वेळापत्रकानुसार येत्या २४ तासांत मुंबईत दाखल होणार आहे.रेल्वेमंत्री पीयूष गोयल यांनी सर्व लोकलमध्ये सीसीटीव्ही बसविण्याचा निर्णय घेतला आहे. मध्य रेल्वेवर ४० लाख प्रवासी सीएसएमटी ते कल्याण-कसारा-कर्जत या मार्गावर प्रवास करतात. त्यांना आधुनिक बम्बार्डिअर लोकलमुळे फायदा होणार आहे. ही लोकल सध्या कोणत्या मार्गावर चालविण्यात येणारयाची अधिकृत माहिती उपलब्ध झालेली नाही.> वेग क्षमता ताशी १०५ किमीबम्बार्डिअर लोकलची वेग क्षमता ताशी १०५ किमी इतकी आहे. ही लोकल मेन मार्गावर मेल-एक्स्प्रेसच्या बरोबरीत धावण्याची शक्यता आहे. परिणामी लोकल फेºयांची संख्या वाढविता येईल, अशी माहिती रेल्वे सूत्रांनी दिली. मध्य रेल्वेच्या बम्बार्डिअर लोकलच्या पाठोपाठ मेधा लोकलच्या बांधणीचे कामही वेगाने पूर्ण होत आहे. त्यामुळे येणाºया काही दिवसांमध्ये प्रवाशांना सुखद आणि आरामदायी प्रवासाचा अनुभव घेता येणे शक्य आहे.