एसटी महामंडळाच्या ताफ्यात लवकरच येणार नवीन बसेस
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 2, 2021 04:06 AM2021-06-02T04:06:43+5:302021-06-02T04:06:43+5:30
प्रवाशांना स्थानकात मिळणार स्वच्छ पाणी, सुसज्ज प्रसाधनगृह लोकमत न्यूज नेटवर्क मुंबई : प्रवाशांचा प्रवास सुखकर होण्यासाठी राज्य शासनाने नवीन ...
प्रवाशांना स्थानकात मिळणार स्वच्छ पाणी, सुसज्ज प्रसाधनगृह
लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : प्रवाशांचा प्रवास सुखकर होण्यासाठी राज्य शासनाने नवीन बसगाड्या घेण्यासाठी भरीव तरतूद केली आहे. आगामी काळात जवळपास अडीच हजार गाड्या खरेदी करण्यात येतील. यामध्ये पर्यावरणपूरक अशा इलेक्ट्रिक बस, एलएनजी, सीएनजी, साध्या तसेच आरामदायी गाड्यांचा समावेश असेल.
प्रवासी ग्राहक हा दैवत असून त्यांना स्वच्छ पाणी मिळावे यासाठी राज्यातील तालुक्यांना जोडल्या जाणाऱ्या काही १०० प्रमुख स्थानकांवर लवकरच आरओच्या माध्यमातून स्वच्छ पाणी देण्यात येईल. एसटी स्थानकांवर मोठी स्वच्छतागृहे बांधण्यात येणार आहेत. यासाठी नाममात्र शुल्क आकारले जाईल.
* सोशल मीडियावर मिळणार माहिती
राज्य परिवहन महामंडळाने उपलब्ध केलेल्या योजना, सेवा तसेच महामंडळाची विविध माहिती अधिकाधिक प्रवाशांपर्यंत पोहोचविण्यासाठी एसटीने स्वतःचे ट्विटर, फेसबुक, इन्स्टाग्राम व टेलिग्राम या समाजमाध्यमांवर अधिकृत खाते उघडले आहे.
..................................................