आयआयटीत माजी विद्यार्थी उभारणार नवीन सेंटर

By Admin | Published: December 29, 2016 01:45 AM2016-12-29T01:45:24+5:302016-12-29T01:45:24+5:30

आयआयटीत शिक्षण घेऊन १९९१ साली बाहेर पडलेले माजी आयआयटीयन्स कॅम्पसमध्ये २५ वर्षांनी पुन्हा एकदा एकत्र जमले होते. या वेळी आयआयटीत सुरू होणाऱ्या

New Center to set up Alumni in IIT, New Center | आयआयटीत माजी विद्यार्थी उभारणार नवीन सेंटर

आयआयटीत माजी विद्यार्थी उभारणार नवीन सेंटर

googlenewsNext

मुंबई : आयआयटीत शिक्षण घेऊन १९९१ साली बाहेर पडलेले माजी आयआयटीयन्स कॅम्पसमध्ये २५ वर्षांनी पुन्हा एकदा एकत्र जमले होते. या वेळी आयआयटीत सुरू होणाऱ्या ‘वारसा प्रकल्पा’साठी या विद्यार्थ्यांनी मिळून ८ कोटींचा निधी उभारण्याची शपथ घेतली आहे. आयआयटी मुंबई कॅम्पसमध्ये अत्याधुनिक तंत्रज्ञान आणि अन्य सेवा उपलब्ध करून देण्यासाठी हा निधी गोळा केला जाणार असल्याचे माजी विद्यार्थ्यांकडून सांगण्यात आले.
आयआयटी कॅम्पसमध्ये माजी विद्यार्थ्यांच्या सत्कार समारंभाचे आयोजन करण्यात आले होते. या वेळी २५ वर्षांपूर्वी आयआयटीतून शिकून बाहेर पडलेल्या विद्यार्थ्यांनी जुन्या आठवणींना उजाळा दिला. यावेळी प्रदीप नाडकर्णी, राज नायर, अविनाश संखोलकर, दिनकर नटराज, सुनीत चितळे आणि अनिरुद्ध नारासिम्हम या माजी विद्यार्थ्यांना गौरवले. (प्रतिनिधी)

Web Title: New Center to set up Alumni in IIT, New Center

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.