नवीन अट... आता मेडिकल कॉलेजसाठी हवे तब्बल १००० खाटांचे हॉस्पिटल

By ऑनलाइन लोकमत | Published: September 21, 2022 01:23 PM2022-09-21T13:23:33+5:302022-09-21T13:24:50+5:30

सध्याच्या नियमाप्रमाणे विद्यार्थी संख्येच्या क्षमतेनुसार ३०० ते ५०० खाटांचे हॉस्पिटल असणे गरजेचे असते

New condition... Now a hospital with 1000 beds is required for the medical college | नवीन अट... आता मेडिकल कॉलेजसाठी हवे तब्बल १००० खाटांचे हॉस्पिटल

नवीन अट... आता मेडिकल कॉलेजसाठी हवे तब्बल १००० खाटांचे हॉस्पिटल

Next

संतोष आंधळे 

मुंबई : नवीन मेडिकल कॉलेज सुरू करायचे असेल तर यापुढे १००० खाटांचे हॉस्पिटल असणे गरजेचे असणार आहे.  राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाने काही जुन्या कायद्यात बदल करण्याचा निर्णय घेतला आहे. सध्याच्या निकषांतील बदलांचा प्रस्तावित मसुदा तयार केला असून तो आयोगाच्या वेबसाइटवर टाकण्यात आला आहे. महाराष्ट्रात प्रत्येक जिल्ह्याच्या ठिकाणी मेडिकल कॉलेज सुरू करण्याचे शासनाने यापूर्वीच जाहीर केले आहे. मात्र, नव्या निकषांची पूर्तता न केल्यास नवीन मेडिकल कॉलेज सुरू करणे कठीण होणार आहे, त्यामुळे हा मसुदा चर्चेत आला आहे.

अट जाचक ठरणार  
एका खासगी वैद्यकीय महाविद्यालयातील अधिकाऱ्याने सांगितले की, १००० खाटांची अट जाचक असून कायद्यातील नवीन बदलास कुणी अनुकूल असे मत देईल, असे वाटत नसल्याचे सांगितले. सध्याच्या नियमाप्रमाणे विद्यार्थी संख्येच्या क्षमतेनुसार  ३०० ते ५०० खाटांचे रुग्णालय चालविणे कठीण असताना १००० खाटांची पूर्तता करणे म्हणजे कुणी नवीन वैद्यकीय महाविद्यालय काढूच शकणार नाही. आर्थिकदृष्ट्या ते परवडणारे नाही.

आधी काय होता नियम?
सध्याच्या नियमाप्रमाणे विद्यार्थी संख्येच्या क्षमतेनुसार ३०० ते ५०० खाटांचे हॉस्पिटल असणे गरजेचे असते. देशात नवीन मेडिकल कॉलेज सुरू करायचे असेल तर आयोगाची परवानगी बंधनकारक असते. 

असा आहे प्रस्तावित मसुदा

nयापुढे संबंधित कायद्याला ‘वैद्यकीय
महाविद्यालयाची स्थापना नियमन (दुरुस्ती) २०२२’ असे म्हटले जाईल. नवीन महाविद्यालयासाठी पात्रता निकष शीर्षकाखाली बदल सुचविले आहेत.
nरुग्णालय व मेडिकल कॉलेजची इमारत यावर एकाच संस्थेची मालकी असावी.
nनवीन कॉलेजसाठी अर्ज करताना कॉलेजची संबंधित इमारत अन्य कोणत्याही कारणांसाठी वापरू नये.
nअर्ज करताना १००० खाटांचे मल्टी स्पेशालिटी रुग्णालय सुरू असणे अपेक्षित आहे, तसेच आयोगाच्या सर्व नियमांचे  पालन केले गेले पाहिजे.

Web Title: New condition... Now a hospital with 1000 beds is required for the medical college

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.