Join us  

जंगलसफारीतून जोडले नवे प्राणिमित्र

By admin | Published: March 21, 2015 12:55 AM

कोपरखैरणे येथे राहणारा समीर केहिमकर या वाइल्ड फोटोग्राफरने गेल्या काही वर्षांमध्ये जंगलसफारी करत फोटोग्राफीचा छंद जोपासत अनेक वन्यजीवांना मित्र बनवले.

प्राची सोनवणे ल्ल नवी मुंबई कोपरखैरणे येथे राहणारा समीर केहिमकर या वाइल्ड फोटोग्राफरने गेल्या काही वर्षांमध्ये जंगलसफारी करत फोटोग्राफीचा छंद जोपासत अनेक वन्यजीवांना मित्र बनवले. वन्यजिवांविषयी सखोल अभ्यास नवनवीन प्रजाती शोधण्यात महत्वाचे योगदान दिले आहे. मुलाचे पाय पाळण्यात दिसतात, असे म्हणतात. समीरच्या बाबतीतही तसेच काहीसे म्हणावे लागेल. लहानपणी खेळाच्या जगात रमण्यापेक्षा रस्त्यावरील मुक्या प्राण्यांना त्यांनी आपलेसे केले. सरपटणारे प्राणी कसे चालतात, कसे आवाज करतात याचे समीरला कुतूहल वाटले. वडील इसाक केहिमकर हे स्वत: एक निसर्गतज्ज्ञ असून, ते बॉम्बे नॅचरल हिस्ट्री सोसायटीमध्ये कार्यरत आहेत. वडिलांपासून मिळालेल्या प्रेरणेतून तसेच निसर्गाच्या प्रेमापोटी केहिमकरांनी या क्षेत्राकडे आपले पाऊल टाकले. घरात साधे झुरळ जरी आले तरी घाबरगुंडी उडणाऱ्या या हल्लीच्या तरुण पिढीमध्ये समीरसारखे तरुण खूप क्वचितच पहायला मिळतात आणि हेच समीरचे वैशिष्ट्य ठरले. फोटोग्राफी करता करता त्याने वन्यजिवांविषयी माहिती जाणून घेतली. उभयचर प्राण्यांविषयीच्या अभ्यासासाठी आयोजित सर्वेक्षणांमध्ये त्याने पुढाकार घेतला. अरुणाचल प्रदेश, प.बंगाल, मेघालय, तामिळनाडू आणि केरळ या ठिकाणी केल्या जाणाऱ्या सर्वेक्षणामध्ये महाराष्ट्रातून केहिमकरांनी पुढाकार घेतला. पश्चिम घाट हे त्यांचे सर्वात आवडते ठिकाण. या ठिकाणी सर्पांच्या विषारी जातींचा त्यांनी अभ्यास केला. सापांचा बचाव करण्याचे कामही केहिमकरांनी हाती घेतले. सापांना पकडून त्यांना जंगलात नेऊन सोडण्याचे काम त्यांनी केले. बॉम्बे नॅचरल हिस्ट्री सोसायटीच्या नवीन उपक्रमातून नवनवीन प्रजाती शोधण्याची संधी केहिमकरांना मिळते.आपल्या भोवतालच्या निसर्गाचे आणि निसर्गातील प्राणी-पक्ष्यांचे संवर्धन केले पाहिजे. पूर्वीच्या नामशेष झालेल्या प्रजातींवर आता माझे संशोधन सुरू आहे. दुर्मीळ प्राण्यांचा शोध घेणे हा एकमेव ध्यास घेऊन मी काम करतो. वृक्षतोड करू नका, वनांचे संवर्धन करा, हीच खरी आपली संपत्ती आहे.- समीर केहिमकर, वाइल्ड लाइफ फोटोग्राफर.च्सॅक्चुरी मॅक्झीनने केहिमकरांच्या वन्यजीव संरक्षणाच्या कामाची दखल घेतली आणि यंग नेचरॅलिस्ट हा पुरस्कार त्यांना दिला.च्वन्यजिवांवर प्रसिध्द होणाऱ्या पुस्तक आणि मासिकांसाठी स्पष्टीकरणात्मक पोस्टर, बॅनर रेखाटण्याचे काम केहिमकर करतात.च्आय-बर्ड, आय-ट्री, आय-बटरफ्लाय या अ‍ॅपची निर्मिती केली.